Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swadhar Yojana 2026: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलनंतर ‘बी-स्टेटमेंट’ कार्यालयात जमा करा; स्वाधारचा निधी मार्गस्थ

एप्रिल महिन्यात तब्बल ५ हजार ८८६ विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा पहिला हप्ता म्हणून अर्धी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 04:18 PM
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलनंतर 'बी-स्टेटमेंट' कार्यालयात जमा करा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलनंतर 'बी-स्टेटमेंट' कार्यालयात जमा करा

Follow Us
Follow Us:

 

  • विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
  • १ एप्रिलनंतर ‘बी-स्टेटमेंट’ कार्यालयात जमा करा
  • स्वाधारचा निधी मार्गस्थ
भरत हिवराळे । नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: एप्रिल महिन्यात तब्बल ५ हजार ८८६ विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा पहिला हप्ता म्हणून अर्धी रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या हप्त्यापोटी १६ कोटी २७ लाख ३४ हजार ९०० रूपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी पाञ विद्यार्थ्यांनी बी-स्टेटमेंट ऑनलाईन अपलोड करून १ एप्रिलनंतर कार्यालयात बी-स्टेटमेंट, आधारकार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत आणून द्यावे. त्यातच पुन्हा ‘स्वाधार’साठी राज्य शासनाकडे १६ कोटी ५० लाख रूपयांची मागणी नुकतीच केली आहे.

शहर व जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी अकरावी ते पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातींच्या पात्र अर्ज झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभदेण्यासाठी जून २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ३० कोटी ८७ लाख ३५ हजार रुपये छत्रपती संभाजीनगरच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागास प्राप्त झाले आहेत. संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने यातून ८ हजार ८४७विद्यार्थ्यांना स्वाधारची रक्कम देण्यासाठी बिले काढली आहेत. यापैकी वर्षभरात २ हजार ३६१ विद्यार्थ्यांच्या खात्यात ११ कोटी ६४ लाख १८ हजार ४०० रुपये जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित ५ हजार ८८६ विद्यार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून १६ कोटी २७ लाख ३४ हजार ९०० रुपयांची बिले तयार आहे. ती कोषागर विभागातून मंजूर होताच येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

विशेषतः सहाय्यक स्वाधार योजना आयुक्त कार्यालयाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी २ कोटी ९५ लाख ५० हजार २०० रुपयांचे बिल कोषागार विभागातून मंजूर करून घेतले आहे. परंतु अद्यापही त्या ६०० विद्यार्थ्यांनी बी स्टेंटमेंट, आधारकार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक ही कागदपत्रे ‘व्हीपीडीए’ साठी आणून दिलेली नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांनी तत्काळ कागदपत्रे आणून द्यावीत, जेणेकरून त्यांच्या खात्यात स्वाधारची रक्कम लवकारात लवकर जमा करता येईल. तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर बी-स्टेटमेंट अपलोड करावेत, असे आवाहन वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक सीमा शिंदीकर यांनी केले आहे.

Art शाखेतही बक्कळ पैसा! 12 वी नंतर फक्त UPSC च नाही तर ‘हे’ आहे 5 हाय-पेइंग करिअर पर्याय, जाणून घ्या सविस्तर

विद्यार्थ्यांनो, बी-स्टेटमेंटसह आधार, पॅन अन् बँक खाते द्या

66 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी वर्ष २०२५-२६ साठी अर्ज केलेल्या व पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले बी स्टेटमेंट ऑनलाईन अपलोड लवकरात लवकर करावेत. अपलोड केल्यानंतर येत्या १ एप्रिलनतर संबंधित विभागात बी-स्टेटमेंटसह आधार, पॅन, बैंक खाते पासबुक आणून द्यावे. त्यातच ज्या ६०० विद्यार्थ्यांनी अद्यापही व्हीपीडीएसाठी कागदपत्रे दिलेली नाहीत त्यांनीही तत्काळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयात जमा करावीत. जेणेकरून पहिला व दुसरा हप्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणे शक्य होणार आहे.
– सीमा शिंदीकर,
वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक

एकदाच विद्यार्थ्यांच्या खात्यात ‘स्वाधार’ची रक्कम जमा करा

८८ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ५३ ते ५६ हजार रुपये दिले जातात. परंतु स्थानिक समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले तरीही स्वाधारचे पैसे दिलेले नाहीत. त्यातच मार्च महिन्यात शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे. त्यातून पहिला हप्ता म्हणून पात्र विद्यार्थ्यांना अर्धीच रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे तो चुकीचा व एकतर्फी आहे. संबंधित विभागाने बी-स्टेटमेंटसह अन्य कागदपत्रे जमा करुन घेत संपूर्ण स्वाधारची संपूर्ण रक्कम जमा करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल. शिक्षण घेता यावे, यासाठी भारतरत्न डॉ.
शिलवंत गोपनारायण, सामाजिक कार्यकर्ता

वर्षभरात स्वाधारसाठी ३०.८७ कोटींचा निधी प्राप्त

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण विभागाकडून वर्ष २०२५-२६ मधील जुलै महिन्यात २ कोटी ५७ लाख १० हजार ४५५ रुपये, ऑगस्ट महिन्यात ६ कोटी रुपये, डिसेंबर २०२५ मध्ये १२ कोटी ३० लाख आणि मार्च २०२६ मध्ये १० कोटी रूपये असा आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरसाठी ३० कोटी ८७ लाख १० हजार ५४४ रुपये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी प्राप्त झाला आहे.

डिग्री तर सगळेच देतात, मग College, Institute आणि University मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Swadhar yojna fund update b statement submission april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Career News
  • Student

संबंधित बातम्या

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
1

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
2

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
3

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
4

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.