
teacher
Swami Vivekanand College of Education Pune Recruitment 2026 : पुण्यातील वाकड येथील स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित आणि NCTE, दिल्ली मान्यताप्राप्त) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तात्पुरत्या स्वरूपात विविध शैक्षणिक पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून २८ सप्टेंबर २०२६ रोजी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
१. प्राचार्य : १ पद (सर्व घटकांसाठी खुले)
२. शारीरिक शिक्षण संचालक : १ पद (सर्व घटकांसाठी खुले)
३. सहाय्यक प्राध्यापक : एकूण १० पदे (विषय: ऑल पेडागोजी विषय आणि ऑल पर्स्पेक्टिव्ह विषय)
यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ पद , अनुसूचित जमातीसाठी १ पद, विमुक्त जाती – १, इतर मागासवर्ग- २ पदे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गांसाठी (SEBC) – १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – १, आणि खुला प्रवर्ग – ३ पदे. तसेच सहाय्यक प्राध्यापक – परफॉर्मिंग आर्ट्स: १ पद (सर्व घटकांसाठी खुले) आणि सहाय्यक प्राध्यापक – म्युझिक अँड फाईन आर्ट्स: १ पद (सर्व घटकांसाठी खुले) निश्चित करण्यात आले आहे.
Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता युजीसी (UGC), एनसीटीई (NCTE), उच्च शिक्षण संस्था (HEI) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नियमांनुसार असणे आवश्यक आहे. ही भरती केवळ २०२६-२७ या एका शैक्षणिक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात केली जात आहे.
इच्छुक उमेदवारांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० या वेळेत थेट मुलाखतीसाठी स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, भूमकर चौक, वाकड, पुणे – ५७ या पत्त्यावर उपस्थित राहावे.
उपस्थित राहताना उमेदवारांनी या जाहिरातीची प्रत, स्वतःचा बायोडाटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-attested) प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी saisakalpune@gmail.com या ईमेलवर किंवा ९२६०६०६०६१ / ९८९००८४५२१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.