फोटो सौजन्य - Social Media
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ITBP मध्ये रिक्त असलेल्या जागा भरल्या जातील. या रिक्त जागांमध्ये ड्राइवर कॉन्स्टेबल पदाचा समावेश आहे. एकंदरीत, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सच्या कॉन्स्टेबल ड्राइवर पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण ५४५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजली आहे. ८ ऑक्टोबर २०२४ पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदत सुरु होताच ताबडतोब आपले अर्ज नोंदवण्यास सुरुवात कर्वे अशी आशा ITBP ने व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : ISRO मध्ये ९९ रिक्त जागांसाठी होणार भरती प्रक्रिया; अधिसूचना झाली जाहीर
उमेदवारांना ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, मुदत जरी जास्त काळाची असली तरी उमेदवारांनी जितके लवकर अर्ज करतील तितके उत्तम असते. ITBP ने या पदासाठी एक अट ठेवली आहे कि या पदासाठी केवळ पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात. ITBP ने या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांना अधिसूचनेचा आढावा घेणे बंधनकारक आहे. या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती पुरवण्यात आली आहे.
ITBP द्वारे आयोजित असलेल्या या भरती मध्ये विविध टप्प्यात निवड प्रक्रिया घेतली जाणार आहे. यामध्ये फिजिकल एफिशिएन्शी तसेच फिजिकल स्टॅंडर्ड चाचणीचा समावेश आहे. लिखित परीक्षा तसेच दस्तऐवजांची तपासणी आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे. अधिसूचनेमध्ये शैक्षणिक अटी तसेच वयोमर्यादे विषयी काही अटी शर्ती नमूद आहेत. ज्यांना पात्र असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतात. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण हवे. त्याचबरोबर उमेदवाराकडे हेवी मोटर व्हीकल ड्रायविंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे इतके असावे. तर जास्तीत जास्त २७ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
हे देखील वाचा : करिअरमध्ये खूप महत्वाचे असते जन्म प्रमाणपत्र; अशा प्रकारे घर बसल्या काढा, ते ही ५ मिनिटांत
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य तसेच इडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवगातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे तर SC /ST तसेच माजी सैनिकांसाठी ही रक्कम निशुल्क आहे. एकंदरीत, त्यांच्याकडून कोणतीही रक्कम आकारण्यात येणार नाही.