फोटो सौजन्य - Social Media
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्य काम करणे हे अनेक जणांचे स्वप्न असते. या स्वप्नांसाठी विद्यार्थी दिवसाची रात्र करतात. तसेच अफाट कष्ट घेतात. या कष्टांना चीज देण्याची संधी चालून आली आहे. ISRO मध्ये HSFC रिक्रुटमेंट २०२४ ला लवकरच सुरुवात होणार आहे. ISRO मध्ये काम करण्याचे स्वप्न असेल तर नक्कीच अर्ज प्रकियेच्या सुरुवातीलाच या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती मिळवून घ्या.
एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या उमेदवार अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्याची मुदत १९ सप्टेंबर २०२४ या तारखेपासून सुरु होणार आहे, तर उमेदवारांना ऑक्टोबरच्या ९ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज नोंदवण्याचे आवाहान ISRO ने केले आहे.
ISRO ने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ९९ शिल्लक जागांचा विचार केला जात आहे. या रिक्त जागांमध्ये ISRO संस्थानातील विविध पदांचा समावेश आहे. मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी ३ जागा रिक्त असून या पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवाराचे MBBS/ MD शिक्षण पूर्ण असावे. वैज्ञानिक तसेच अभियंताच्या पदासाठी १० जागा शिल्लक आहेत. B.Tech/ M.Tech शिक्षण असलेल्या उमेदवाराला या पदासाठी अर्ज करता येऊ शकते. टेक्निकल असिस्टंट पदासाठी २८ जागा रिक्त आहेत तर साहाय्यक वैज्ञानिक पदी १ जागा रिक्त आहे. या पदांसाठी उमेदवाराचे अनुक्रमे Engg. Diploma तसेच B.Sc. शिक्षण पूर्ण असावे.
हे देखील वाचा : ‘महावाचन उत्सवात’ विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद ! 12 लाखाहून जास्त विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
मुळात १० वी उत्तीर्ण त्यासह ITI चे प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना टेक्निशियन तसेच Draughtsman- B च्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. Technician- B पदासाठी एकूण ४३ जागा शिल्लक आहेत. तर Draughtsman – B च्या पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. Assistant (Rajbhasha) या पदासाठी अर्ज करण्यास ऐच्छिक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून पदवीधर असणे अनिवार्य आहे. केवळ एका उमेदवाराची नियुक्ती या पदासाठी केलेली जाणार आहे. वयोमर्यादा पदावर अवलंबून आहे. अधिक सखोल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावे.