Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटी क्षेत्रात मोठी भरभराट ! 74% कंपन्या Freshers उमेदवारांना नोकरी देण्यास तयार

जर तुम्ही सुद्धा फ्रेशर असाल आणि आयटी क्षेत्रात नोकरी शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच एक रिपोर्ट जारी झाला आहे ज्यात 74% कंपन्या नवोदितांना नोकरी देण्यास तयार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 24, 2025 | 08:40 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीची लर्निंग आणि एम्प्लॉयबिलिटी सोल्यूशन्स कंपनी टीमलीज एडटेक ने आपल्या व्यापक करिअर आऊटलुक रिपोर्ट एचवाय१ (जानेवारी – जून २०२५) ची घोषणा केली आहे. या अहवालात नव्या पदवीधरांसाठी भारतात उदयास येणाऱ्या करिअर संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. २०२५ मध्ये फ्रेशर्ससाठी हायरिंग इंटेंट ७४% पर्यंत वाढला आहे, जो उद्योग क्षेत्रातील वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत विविध उद्योगांमध्ये भरतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप्समध्ये हायरिंग इंटेंट ६१% वरून ७०% (+९%) पर्यंत वाढला आहे, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ५२% वरून ६६% (+१४%) झाला आहे, आणि इंजिनीयरिंग व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात ५९% वरून ६२% (+३%) पर्यंत वाढ झाली आहे. आयटी क्षेत्राने मोठी सुधारणा दर्शवली आहे, जिथे २०२४ मधील ४५% हायरिंग इंटेंट एचवाय१ २०२५ मध्ये ५९% पर्यंत पोहोचले आहे.

PM Kisan 19th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, तुम्हाला मिळणार की नाही? तुमचं नाव येथे तपासा

हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातही सकारात्मक वाढ दिसून आली आहे, ज्यामध्ये हायरिंग इंटेंट ४७% वरून ५२% (+५%) पर्यंत वाढला आहे. छोटे क्षेत्र जसे की पॉवर आणि एनर्जी तसेच मार्केटिंग आणि एडवरटाइजिंग मध्येही वाढ झाली असून अनुक्रमे ४% आणि २% वाढीसह हायरिंग इंटेंट २२% आणि ११% वर पोहोचला आहे.

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी पाहिल्यास, बंगळुरू (७८%), मुंबई (६५%), दिल्ली-एनसीआर (६१%) आणि चेन्नई (५७%) हे पदवीधरांसाठी प्रमुख रोजगार केंद्रे ठरत आहेत.

रिपोर्टनुसार, डीप-टेक स्किल्स असलेल्या नोकऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. प्रमुख जॉब रोल्समध्ये क्लिनिकल बायोइनफॉर्मेटिक्स असोसिएट, रोबोटिक्स सिस्टीम इंजिनीयर, सस्टेनेबिलिटी एनालिस्ट, प्रॉम्प्ट इंजिनीयर, एआय आणि मशीन लर्निंग इंजिनीयर, क्लाउड इंजिनीयर आणि सायबर सिक्योरिटी एनालिस्ट यांचा समावेश आहे. कंपन्या रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, परफॉर्मन्स मार्केटिंग, नेटवर्क सिक्युरिटी आणि फायनान्शियल रिस्क एनालिसिस यासारख्या कौशल्यांमध्ये प्रवीण उमेदवार शोधत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ऑटोमेशनमुळे अनेक क्षेत्रात मोठे बदल होत असून, त्यामुळे भरती प्रक्रियाही प्रभावित होत आहे. कंपन्या आता प्रोडक्टिविटी आणि कोलॅबोरेशन टूल्स (८३%), प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि टास्क ट्रॅकिंग सॉफ्टवेअर (७३%) आणि डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स (६४%) वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. दुसरीकडे, नवीन पदवीधर डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डेटा एनालिसिस (९२%), कोडिंग असिस्टन्स टूल्स (६६%) आणि प्रॉम्प्ट इंजिनीयरिंग (५७%) वर लक्ष केंद्रित करत आहेत, जेणेकरून त्यांची कौशल्ये उद्योगाच्या मागणीशी सुसंगत राहतील.

ना चोरी, ना कोणता घोटाळा; तरीही 21 दिवसात भारतातून गायब झाले 23710 कोटी रूपये, काय आहे गडबड

रिपोर्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड स्पष्ट झाला आहे – डिग्री अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम्सच्या वाढत्या संधी. कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग (३०%), इंजिनीयरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२३%) आणि माहिती तंत्रज्ञान (१२%) क्षेत्रांमध्ये डिग्री अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम्स स्वीकारत आहेत, ज्यामुळे उद्योगांना कुशल कर्मचारी तयार करण्यास मदत होत आहे.

टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शांतनु रूज म्हणाले “७४% हायरिंग इंटेंट हा फ्रेशर्ससाठी वाढत्या संधींचे स्पष्ट संकेत देतो. एआय आधारित कौशल्ये, डिजिटल सक्षमता आणि अडॅप्टेबिलिटी विकसित करणे गरजेचे आहे, जेणेकरून भारताच्या गतिमान जॉब मार्केटमध्ये त्यांना योग्य संधी मिळू शकतील.”

हा रिपोर्ट भारतभरातील ६४९ नियोक्त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित असून, यात फ्रेशर्स आणि डिग्री अप्रेंटिससाठी हायरिंग ट्रेंड्स आणि नवीन कौशल्यांच्या मागण्या याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Teamlease report states that 74 companies will hire freshers candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 08:40 PM

Topics:  

  • Business News
  • Career News
  • Marathi News

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
2

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू
3

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण
4

BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.