
फोटो सौजन्य - Social Media
सदर परीक्षेकरिता शिवाजी विद्यालय, मुलीबाई चरखा इंग्लिश स्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, बाकलीवाल जाधव विद्यालय, सुशिलाताई विद्यानिकेतन, मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालय, माऊंट कार्मेल स्कूल, दि वर्ड स्कूल, आर. ए. कॉलेज, श्री लालबहादुर विद्यालय, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, नवोदय विद्यालय, रेखाताई कन्या विद्यालय, झेड. पी. हायस्कूल, सय्यद मोहसीन उर्दू हायस्कूल इमामपुरा, लॉयन्स विद्यानिकेतन, नारायणा किड्स, समर्थ इंग्लिश स्कूल, विद्याभारती माध्यमिक शाळा, शरदचंद्रजी पवार विद्यालय सुपखेला, काशिरामजी पाटील विद्यालय सुपखेला आणि राधादेवी बाकलीवाल कन्या विद्यानिकेतन ही केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
सदर परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेशानुसार ओळखपत्राशिवाय कोणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. केंद्राधिकारी, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांखेरीज इतर कोणालाही प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात जाणूनबुजून वाहतूक कोंडी निर्माण करणे प्रतिबंधित असून टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल सेवा तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदी राहील. मोबाइल फोन, वायरलेस सेट, रेडिओ, दूरदर्शन, कॅलक्युलेटर आणि संगणक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर देखील पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे.