Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET निकालाआधीच पदोन्नती? जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात 18 जणांची न्यायालयात धाव

राज्यात शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 19, 2026 | 08:34 AM
TET निकालाआधीच पदोन्नती? 18 जणांची न्यायालयात धाव

TET निकालाआधीच पदोन्नती? 18 जणांची न्यायालयात धाव

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून, प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. ज्येष्ठतेच्या आधारे टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, काही शिक्षकांनी या प्रक्रियेला आक्षेप घेत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

राज्यात शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नियमानुसार परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पदोन्नती प्रक्रिया निर्धारित कालावधीत राबविणे अपेक्षित आहे.

हेदेखील वाचा : TET परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील ९६ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण! गुरुजी झालं नापास, नाराजीचे वातावरण

दरम्यान, याचिकाकर्त्या शिक्षकांचा आरोप आहे की, प्राथमिक शिक्षण विभाग पदोन्नती प्रक्रिया वेळेपूर्वी राबवत आहे. टीईटी उत्तीर्ण प्राथमिक शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषदेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाला काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

शिक्षकांचे युक्तिवाद

शिक्षकांचे म्हणणे आहे की, न्यायालयाच्या आदेशानंतरही गेल्या वर्षी अनेक शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नव्हती. निकाल जाहीर झाल्यानंतर १९ जानेवारी रोजी शासनाने टीईटी पात्र शिक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भात पत्र जारी केले. मात्र, स्पष्ट मार्गदर्शक सूचनांच्या अभावामुळे अनेकांनी पूर्वी परीक्षा दिली नव्हती.

80 टक्के शिक्षकांचे टीईटी निकाल जाहीर होणे बाकी

सध्या सुमारे ८० टक्के शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली असून, त्यांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच पदोन्नती प्रक्रिया राबविण्याची घाई केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. धनराज राजपूत यांच्यासह अठरा शिक्षकांनी निषेधार्थ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

भविष्यात ज्येष्ठतेवरून नवा वाद?

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे की, सध्याच्या टीईटी पात्र शिक्षकांना पदोन्नती दिल्यास भविष्यात ज्येष्ठतेवरून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. पुढे अधिक शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाल्यास आधी दिलेल्या पदोन्नतींचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Teachers file petition in court over promotion before tet results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • TET Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.