
शहरातील डी. जी. कॉलेज केंद्रावर वेळेत पोहोचूनही अनेक परीक्षार्थींना आत प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून साताऱ्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी ठरलेल्या वेळेत केंद्रावर हजर झाल्याचे सांगितले. मात्र, गेटवरच त्यांना थांबवून आत सोडण्यात आले नसल्याने त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. “आमचे वर्ष वाया गेले, आम्हाला कारण तरी सांगा. आम्हाला केंद्रसंचालकांना भेटायचे आहे,” अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान काही काळ परीक्षार्थी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी “नियमांनुसार प्रवेश देणे शक्य नाही” असे सांगत विद्यार्थ्यांना थांबवले. घडामोडींची माहिती मिळताच सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी आणि निरंतर शिक्षणाधिकारी शबनम मुजवावर यांनी डी. जी. कॉलेज केंद्राला भेट दिली. त्यांनी पोलिसांना ‘संबंधित परीक्षार्थीना गेटच्या बाहेर काढा’ अशा सूचना दिल्या.
मोठ्या आशेने आलेले परीक्षार्थी हातात प्रवेशपत्र घेऊन गेटसमोरच निराश अवस्थेत उभे राहिले. प्रशासनाच्या कठोर भूमिकेबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “कसली दया-माया नाही, नियम सांगत आमचे भविष्य बिघडवले,” अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस व परीक्षार्थी यांच्यात शाब्दिक वादही झाला. या गोंधळामुळे टीईटी परीक्षेच्या आयोजनाविषयी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एकीकडे हा सावळा गोंधळ तर दुसरीकडे सांगलीत टीईटी परीक्षा कोणत्याही आडकाठी विना पार पाडली. शिक्षक पात्रता परिक्षेसाठी 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली होती.जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सांगलीतील कोणत्याही केंद्रात गैरप्रकार घडला नाही, असं सांगण्यात आलं.
मात्र कोल्हापुरची परिस्थिती चिंताजनक दिसून आली. राज्यभरामध्ये होत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या प्रयत्न कोल्हापुरात दिसून आला. या टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण व मुरगूड पोलिसांनी रविवारी पहाटे कागल तालुक्यातील सोनगे येथे पर्दाफाश केला. याप्रकरणी 9 जणांना अटक केली असून आणखी 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Ans: टीईटी (Teacher Eligibility Test) ही महाराष्ट्रात 1 ते 8वीपर्यंतच्या शिक्षक पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.
Ans: साताऱ्यातील डी. जी. कॉलेज परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला. गेटवरच रोखल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली व काही काळ पोलिसांशी तणाव निर्माण झाला.
Ans: अधिकृत कारण स्पष्ट नसले तरी, ‘नियमांनुसार प्रवेश देणे शक्य नाही’ असे पोलिसांनी सांगितले. आधार पडताळणी व वेळेपलीकडचा प्रवेश यासंबंधी कडक नियमांमुळे असे घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते.