Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी मावळ सज्ज! २३६९ विद्यार्थ्यांना ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी मावळ तालुक्यातील १७ परीक्षा केंद्रांवर एकूण ७,६४९ विद्यार्थी बसणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 21, 2026 | 04:34 PM
Free pick-up and drop facility from home to examination center for 2369 students in Maval for 10th exam

Free pick-up and drop facility from home to examination center for 2369 students in Maval for 10th exam

Follow Us
Close
Follow Us:
  • मावळमधील डोंगरदऱ्यात असलेल्या आणि दळणवळणाची साधने कमी असलेल्या गावांसाठी ही सेवा ‘लाईफलाईन’ ठरली आहे.
  • खाजगी वाहनांची वाट पाहण्यात किंवा एसटीच्या वेळापत्रकावर अवलंबून राहण्यापेक्षा, विशेष बस सुविधेमुळे विद्यार्थी वेळेवर केंद्रावर पोहोचू शकतील.
  • २०१६ पासून सुरू झालेली ही सेवा आजही तितक्याच कार्यक्षमतेने सुरू असल्याने पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Maval SSC Board Exam 2026 : मावळ तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि सुरक्षित पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने यंदाही मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सन २०१६-१७ पासून सुरू झालेला हा उपक्रम यंदा दहाव्या वर्षात प्रवेश करत असून, यावर्षी ७१ गावांतील २३६९ विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.

‘घर ते परीक्षा केंद्र’ सुविधा

इंदोरी, बोरवली, पवनानगर, जांभूळ, ब्राह्मणवाडी, तुंग, निगडे, आंबळे, घोलपवाडी, कदमवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, निळशी, कुसुर, कुसवली, पवळेवाडी, कल्हाट, भोयरे, कशाळ, सावळा, सांगवी, शिवणे, डोणे, ओवळे, थोरण, वडेश्वर, धनगव्हाण, वारू, कोथुर्णे, मळवंडी, बौर, ओझर्डे, पिंपळवळी, पाथरगाव, कार्ला, अजिवली, वराळे, साई, नवीन उकसान, नाणे, सोमाटणे, बेबेडओहोळ, परंदवडी, शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, सुदुंब्रे, आढले बुद्रुक, करुंज, देवघर, उकसान आदी गावांतील विद्यार्थ्यांसाठी ‘घर ते परीक्षा केंद्र’ आणि परीक्षा संपल्यानंतर परतीचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

Karjat Crime: दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

१७ परीक्षा केंद्रांवर ७,६४९ विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी मावळ तालुक्यातील १७ परीक्षा केंद्रांवर एकूण ७,६४९ विद्यार्थी बसणार आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत आहे.

प्रवास सुविधेची गरज का?

मावळ तालुक्यातील अनेक गावे डोंगराळ व दुर्गम भागात आहेत. परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बससेवा मर्यादित असते. तसेच खासगी वाहतुकीच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची

विद्यार्थ्यांना मानसिक आधार

मोफत वाहतूक सेवेने विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ताण कमी होत असून, वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. गेल्या नऊ वर्षांप्रमाणे यंदाही पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

“विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबत त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, भविष्यातही ती सुरू राहील.”
— आमदार सुनील शेळके

मावळ तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आश्वासक ठरत असून, दहाव्या वर्षात पदार्पण करताना या सेवेला अधिक व्यापक प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Free pick up and drop facility from home to examination center for 2369 students in maval for 10th exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Educational News
  • maval news
  • Maval Politics

संबंधित बातम्या

लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
1

लोणावळा अत्याचार प्रकरणाची निलम गोऱ्हेंनी घेतली दखल; प्रशासनाला दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.