फोटो सौजन्य - Social Media
न्यू एजुकेशन पॉलिसी (NEP २०२०)च्या माध्यमातून राज्यातील शिक्षण प्रणालीत अनेक बदल केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाचा आणि राज्यातील शिक्षण प्रणाली आणखीन विकसित करण्याचा दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. त्यामध्ये नवा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावानुसार, २०२६ – २७ या शैक्षणिक वर्षांपासून या प्रस्तावाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार, राज्यात शैक्षणिक वर्ष एप्रिल १ ते मार्च ३१ पर्यंत असणार आहे.
ही शैक्षणिक दिग्दर्शिका सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशनसारखी आहे. परंतु, अद्याप या प्रस्तावासंबंधित जीआर जाहीर करण्यात आला नाही आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा या प्रस्तावाचा मुख्य हेतू आहे. तसेच राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर होणाऱ्या अनेक फायद्यांसाठी हा प्रस्ताव लागू करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात, या प्रस्तावाला काही विरोधही केले जात आहे. महाराष्ट्र शिक्षण विभाग हा प्रस्ताव २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षामध्येच लागू करणार होता. परंतु, वाढत्या विरोधामुळे हि अंमलबजावणी ढकलण्यात आली आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापिकांनी तसेच शिक्षक वर्गांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे निर्णयाला पुढे ढकलण्यात आले आहे.
नव्या धोरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयाची निवड करण्याची मुभा देण्यात येणार आहे. पाठांतरापेक्षा गणित आणि विज्ञान या विषयावर जास्त लक्ष दिले जाईल. महाराष्ट्र शाळा मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते महेंद्र गनपुले म्हणाले, “CBSE मंडळाशी सुसंगत शैक्षणिक दिनदर्शिका आम्हाला मान्य नाही. एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू केल्याने मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गंभीर अडचणी येऊ शकतात. जोपर्यंत GR जारी होत नाही, तोपर्यंत आम्ही हा निर्णय गांभीर्याने घेणार नाही. आम्ही शिक्षणमंत्र्यांना या प्रस्तावाला पूर्णतः विरोध करत असल्याचे कळवले असून, तो 2026-27 पर्यंत पुढे ढकलण्याऐवजी रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.”
शाळा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “31 मार्चला शैक्षणिक वर्ष संपवून 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल. सरकार अंतिम आदेश किंवा GR लवकरच जारी करेल.” नव्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार, राज्य मंडळाच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी 1 मे ते 14 जून या कालावधीत असेल. SCERT चे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी सांगितले की, “लवकरच GR जारी करून अधिक माहिती दिली जाईल.”