Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवा महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन…

"विरार येथील विवा इन्स्टिटूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे" असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता अभिनेता रवी जाधव यांनी काढले.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 23, 2025 | 05:45 PM
विवा महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन...

विवा महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन...

Follow Us
Close
Follow Us:

“विरार येथील विवा इन्स्टिटूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे” असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता व अभिनेता रवी जाधव यांनी गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाच्या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून मुलांना मार्गदर्शनपर भाषणात काढले. रवी जाधव यांच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा सपंन्न झाला.

यावेळी संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर तसेच मार्गदर्शक राजू वनमाळी, अनिल ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. विष्णू वामन चॅरीटेबल ट्रस्टचे विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट ह्या विरार पूर्व, शिरगाव येथील कला महाविद्यालयात २०१० साली बी एफ ए ह्या पदवी मध्ये अप्लाइड आर्ट व पेंटिंग हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. समारंभाच्या सुरुवातीस प्राचार्या डॉ. संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामगिरीची दाखल घेऊन संस्थेच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेत पाहुण्यांचे स्वागत केले. या नंतर संस्थेने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, ७ वर्षापूर्वी सुरु केलेल्या अत्यंत्य स्त्युत्य अश्या ‘सन्मानपत्र’ बहाल करण्याच्या च्या कार्यक्रमास सुरुवात झाली.

वसईच्या मातीतील प्रसिद्ध शिल्पकार, हाडाचे कलावंत शांताराम चिंतामण सामंत म्हणजेच सर्वांना सुपरिचित असलेले श्री दत्ता सामंत यांचा ‘सन्मानपत्र’ बहाल करत यथोचित गौरव करण्यात आला. सदैव हसतमुख असे व्यक्तिमत्त्व लाभलेले व सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगणारे दत्ता सामंत यांनी वयाच्या ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे व या समारंभात सरांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना नवीन विधानभवनात अशोक स्तंभ बसवण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. सरांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये सर्वात महत्वाचा असा ‘महाराष्ट्र राज्यशासन’ पुरस्कार हा होता. सरांच्या निवासस्थानी त्यांना भेटून त्याच्याकडून माहिती घेत त्यांच्या वर विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रफीत कार्यक्रमाच्या वेळी दाखवण्यात आली.

या नंतर शिखर ठाकूर यांनी त्यांच्या आकर्षक शैलीत विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे रवी जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करत विध्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उस्फुर्त पणे उत्तरे दिली. सदर कला प्रदर्शन विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट, शिरगाव, कुंभारपाडा, विरार-पूर्व येथे, मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ९ ते ४:३० दरम्यान सर्वांसाठी खुले आहे. चित्रकला या विषयात उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत तरी त्या बद्दल अधिक माहिती व यात असणारी वेगवेगळी क्षेत्र या बद्दल प्रदर्शनात असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती वरून कल्पना येऊ शकते.

Web Title: The annual art exhibition was organized at virar viva college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • education news
  • Mumbai City
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी
1

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
2

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
3

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन
4

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.