Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे विजेत्या शाळा जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळांना देण्यात आले पुरस्कार

महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अभियानात विजेत्या ठरलेल्या शाळा जाहीर करण्यात आल्या. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

  • By नारायण परब
Updated On: Oct 14, 2024 | 08:50 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ येथील एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.

शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शाळा हा आपल्या आयुष्यातील हळुवार कोपरा असतो. शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. शाळा ही आयुष्यातील ज्ञान मंदिर असते. शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते. आईवडील जन्म देतात तर शिक्षक हे आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे गुरूजनांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यस्तरीय पुरस्कार – शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गट – प्रथम- जिल्हा परिषद आदर्श पाथमिक शाळा धानोरे, जिल्हा, पुणे; द्वितीय नवी मुंबई महानगरपालिका राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55; तृतीय – जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगर, जिल्हा- गडचिरोली.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा – प्रथम – प्रभात किड्स स्कूल अकोला जिल्हा अकोला, द्वितीय -कर्मवीर आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर, जिल्हा धुळे; तृतीय – कै. दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द, जिल्हा जालना.

पुरस्काराचे स्वरुप

राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 31 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख रुपये. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 15 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 11 लाख रुपये. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला 11 लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपये. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले गेले.

Web Title: The winning schools of chief minister majhi shokla sunder shala abhiyaan were announced the schools were awarded by the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 08:50 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार
1

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ
2

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
3

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
4

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.