फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे केवळ भविष्य नाही, तर सध्याचे वास्तव आहे. अनेक स्टार्टअप्सपासून ते मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांपर्यंत AI तंत्रज्ञानावर आधारित सोल्युशन्स विकसित करत आहेत. त्यामुळे AI क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना अधिक संधी आणि उत्तम वेतन मिळण्याची शक्यता असते.
मशीन लर्निंग इंजिनिअर:
या भूमिकेत डेटा विश्लेषण, अल्गोरिदम तयार करणे आणि सिस्टम ऑटोमेशन यावर काम केले जाते. Python, R आणि TensorFlow यासारख्या टूल्सचा वापर केला जातो. अनुभवी अभियंत्यांना 1.4 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.
कम्प्युटर व्हिजन इंजिनिअर:
या प्रोफाइलमध्ये संगणकाला व्हिज्युअल माहिती (जसे की फोटो आणि व्हिडिओ) समजण्यास सक्षम करणे अपेक्षित असते. ह्या प्रकारच्या सोल्युशन्सना हेल्थकेअर, ऑटोमेशन आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठी मागणी आहे. 1 ते 2 कोटी रुपयांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता असते.
रोबोटिक्स इंजिनिअर:
हे अभियंते स्मार्ट रोबोटिक सिस्टम्स डिझाईन आणि डेव्हलप करतात. यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही बाबतीत प्रावीण्य आवश्यक आहे. खासगी औद्योगिक कंपन्या आणि संरक्षण संशोधन संस्था ह्या भूमिकेसाठी 1 कोटी रुपयांपर्यंत वेतन देतात.
डीप लर्निंग इंजिनिअर:
AI च्या या विशेष शाखेत न्यूरल नेटवर्क्स, NLP (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) आणि GANs सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असतो. योग्य कोडिंग स्किल्स आणि अनुभव असलेल्या व्यक्तींना 80 ते 90 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.
क्लाउड AI इंजिनिअर:
ही भूमिका AI आणि क्लाउड कंप्युटिंग यांचं कॉम्बिनेशन आहे. AWS, Azure आणि Google Cloud सारख्या प्लॅटफॉर्मवर एआय आधारित सोल्युशन्स तयार केली जातात. अशा अभियंत्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत पगार मिळतो.
AI क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी योग्य दिशा, टेक्निकल स्किल्स आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. एकदा कौशल्य मिळवले की, हे क्षेत्र उच्च वेतन आणि आंतरराष्ट्रीय संधी देणारे सर्वोत्तम करिअर ठरू शकते.