Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on BJP: “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”; AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या परिषदेला 'अव्यवस्थित पीआर तमाशा' संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या समिटमध्ये भारतीयांचा डेटा विकला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 05:48 PM
Congress leader Rahul Gandhi's reaction on Iran-Israel world war 3

Congress leader Rahul Gandhi's reaction on Iran-Israel world war 3

Follow Us
Close
Follow Us:
  • “भारतीय डेटाची विक्री आणि चिनी उत्पादनांचे प्रदर्शन”
  • AI समिटवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
  • काय आहे ‘गलगोटिया रोबोट’ विवाद?
Rahul Gandhi News: देशाची राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक एआय समिट’वरून (AI Summit) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या परिषदेला ‘अव्यवस्थित पीआर तमाशा’ संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या समिटमध्ये भारतीय प्रतिभेचा अपमान होत असून, भारतीयांचा डेटा विकला जात असल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींचा ‘एक्स’वरून निशाणा

राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “भारताची प्रतिभा आणि अफाट डेटाचा विधायक वापर करण्याऐवजी, ही एआय समिट केवळ प्रसिद्धीसाठीचा एक विस्कळीत तमाशा ठरत आहे. येथे भारतीय डेटाची खुलेआम विक्री केली जात आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय सांगून चक्क चिनी उत्पादनांचे प्रदर्शन केले जात आहे.”

Instead of leveraging India’s talent and data, the AI summit is a disorganised PR spectacle – Indian data up for sale, Chinese products showcased. https://t.co/5liaoX0XXp — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 18, 2026

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

काँग्रेसचा सरकारवर ‘डेटा पॉवर’वरून प्रहार

राहुल गांधींनंतर काँग्रेस पक्षानेही आपल्या अधिकृत हँडलवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. “मोदी सरकारने एआयच्या क्षेत्रात जगासमोर भारताचे हसू केले आहे. या समिटमध्ये चिनी रोबोट्सना ‘मेड इन इंडिया’ म्हणून दाखवले जात असून, चिनी माध्यमांनीही भारताची थट्टा उडवली आहे. ही बाब देशासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील या खोटेपणात सहभागी असून ते चिनी उत्पादनांना प्रोत्साहन देत आहेत,” अशी टीका काँग्रेसने केली आहे. भारताकडे असलेल्या डेटाच्या ताकदीवर आपण या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करू शकलो असतो, मात्र सरकारने देशाच्या प्रतिमेचे कधीही भरून न निघणारे नुकसान केले आहे, असा आरोपही पक्षाने केला.

काय आहे ‘गलगोटिया रोबोट’ विवाद?

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी नोएडातील गलगोटिया युनिव्हर्सिटीने प्रदर्शित केलेला ‘ओरियन’ (Orion) नावाचा रोबोट आहे. हा एक पाळत ठेवणारा रोबोट असल्याचे सांगत विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंह यांनी असा दावा केला होता की, हा रोबोट त्यांच्या ३५० कोटी रुपयांच्या ‘AI इनिशिएटिव्ह’चा भाग आहे. मात्र, तपासात असे समोर आले की, हा रोबोट प्रत्यक्षात चीनमध्ये तयार झालेला ‘युनिट्री Go2’ (Unitree Go2) आहे, जो बाजारात अवघ्या २.३ लाख रुपयांना उपलब्ध आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या नावाखाली चिनी रोबोटचे प्रदर्शन झाल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

सरकारकडून स्टॉल हटवण्याचे निर्देश?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद उघडकीस आल्यानंतर सरकारने गलगोटिया युनिव्हर्सिटीला समिटमधील आपला स्टॉल तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने असा कोणताही अधिकृत संदेश किंवा पत्र मिळाले नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले असून, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या दाव्यांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

Web Title: Rahul gandhi attacks the central government on the ai summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • ai
  • BJP
  • central goverment
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

BJP आणि RSS विषारी साप…! मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याचा नितीन नबीन यांनी घेतला खरपूस समाचार
1

BJP आणि RSS विषारी साप…! मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याचा नितीन नबीन यांनी घेतला खरपूस समाचार

“महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोर मतदार”; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, SIR मोहिमेची मागणी
2

“महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोर मतदार”; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, SIR मोहिमेची मागणी

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान
3

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान

Bengal Election: बंगालमध्ये पुन्हा ‘दीदी’च? ताज्या ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढवली; पाहा काय सांगतेय आकडेवारी
4

Bengal Election: बंगालमध्ये पुन्हा ‘दीदी’च? ताज्या ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढवली; पाहा काय सांगतेय आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.