Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुर्ला येथे प्रशिक्षणवर्गाचे उदघाटन! शिक्षण साहित्याचे वाटप आले करण्यात

मुंबईतील कुर्ला येथे संकल्प संस्थेच्या पाचव्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन डॉ. नारायण अय्यर आणि सुरज भोईर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2025 | 12:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • कुर्ला येथे संकल्प संस्थेच्या पाचव्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन
  • पंचरत्न मित्र मंडळ व युथ कौन्सिलतर्फे २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
  • ७५ मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप!
मुंबईत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने संकल्प संस्थेच्या वतीने आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणवर्गाच्या पाचव्या बॅचचे उद्घाटन पंत वालावलकर शाळा, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथे उत्साहात पार पडले. सामाजिक कार्यकर्त्यांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्प संस्थेने सामाजिक क्षेत्रात नवीन कल्पना, उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून नेहमीच अग्रणी भूमिका बजावली आहे. या प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन अक्षयशक्ती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नारायण अय्यर आणि मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

कार्यक्रमाची सुरुवात स्वाती पाटील आणि वनिता सावंत यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना सविता हेंडवे यांनी केली, तर पाहुण्यांचा परिचय वनिता सावंत यांनी करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेह कासारे यांनी कुशलतेने सांभाळले. प्रमुख पाहुणे डॉ. अय्यर आणि सुरज भोईर यांनी प्रशिक्षणार्थींना सामाजिक कार्यकर्त्यांचे महत्त्व, समाजातील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या यांविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि समर्पण या गुणांचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, सजग आणि समाजहिताची भावना बाळगणारे कार्यकर्ते तयार व्हावेत, अशी अपेक्षा दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुंबईतील चेंबूर परिसरात पंचरत्न मित्र मंडळ आरसीएफ आणि युथ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य व शालेय वस्तूंचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २०० विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, पाऊच यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी आवश्यक कपाट, टेबल-खुर्च्या यांचाही पुरवठा करण्यात आला. विशेषतः मुलींच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून ७५ मुलींना १५० सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वित्त संचालक नजहत शेख, महाव्यवस्थापक संजय पेटकर, सीसीएनसीएसआर आरसीएफचे डॉ. रजनीश कुमार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रमा सिंग उपस्थित होत्या. नजहत शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर यांनी केले.

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

सामाजिक कार्यकर्ता घडविण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यापर्यंत अशा विविध उपक्रमांतून सामाजिक संस्थांनी उचललेली भूमिका कौतुकास्पद ठरत आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे या दोन्ही कार्यक्रमांतून अधोरेखित होते.

Web Title: Training class inaugurated in kurla educational materials distributed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Career
  • kurla

संबंधित बातम्या

उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश
1

उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

SAIL Jobs 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती, 1.80 लाखांपर्यंत पगार, तात्काळ करा अर्ज
2

SAIL Jobs 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती, 1.80 लाखांपर्यंत पगार, तात्काळ करा अर्ज

WCL Recruitment 2025: WCL मध्ये करिअरची संधी, 1213 अप्रेंटिस पदांची मोठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू
3

WCL Recruitment 2025: WCL मध्ये करिअरची संधी, 1213 अप्रेंटिस पदांची मोठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

Mumbai News: मराठी शाळा महाराष्ट्रातच झाल्या जड? बिल्डरच्या हट्टापायी शिक्षणाचा बळी? संतप्त नागरिकांचे आंदोलन
4

Mumbai News: मराठी शाळा महाराष्ट्रातच झाल्या जड? बिल्डरच्या हट्टापायी शिक्षणाचा बळी? संतप्त नागरिकांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.