
Hardik Pandya Turning point story
PAK vs NAM: पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’, ही एक चूक अन् पाक T20 World Cup 2026 मधून बाद!
२०१६च्या टी-२० विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धची मॅच होती. हार्दिक पांड्याने टाकलेला एक निर्णायक षटक जो त्याच्या कारकीर्दीला आकार देऊन गेला. सुपर १० ग्रुप २ चा सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला शेवटच्या षटकात फक्त ११ धावांची आवश्यकता होती. त्यांच्या हातात ४ विकेट्स होत्या. धडाकेबाज खेळी करणारा महमुदुल्ला १७ धावांवर आणि मुशफिकुर रहीम ३ धावांवर खेळत होता. यासगळ्यात तणावाच्या परिस्थितीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटचं षटक हार्दिक पांड्याकडे सोपवलं, त्याच संधीचं सोनं केल्याचे या मॅचमध्ये पाहायला मिळलं.
“त्या संधीने माझं व्यक्तिमत्त्व घडवलं. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच काही आव्हानं होती. त्यावेळी माझ्या आत्मविश्वासाची परिक्षा घेतली गेली. त्यावेळी तो आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा होता. क्रिकेटमध्ये १ टक्का जरी चान्स असला तरीही शेवटचा बॉल असेपर्यंत सामना संपत नाही”, अशी माहिती जिओ स्टारसोबत बोलताना हार्दिक पांड्याने त्या क्षणाच्या आठवणींना उजाळा दिला.
या मॅचबाबत बोलताना पांड्याने सांगितलं, “बांगलादेशविरुद्धचा तो सामना एक उत्तम उदाहरण आहे. फलंदाजांनी तर शेवटचा बॉल शिल्लक असतानाच सामना जिंकल्यासारखं सेलिब्रेशन सुरु केलं होतं”.
पांड्या पुढे सांगतो की, जेव्हा गोष्टी बदलत जातात तेव्हा अविस्मरणीय आठवणी घडत जातात. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आव्हानांनी हार्दिक पांड्याला कशाप्रकारे आकार दिला, असे बरेच क्षण माझ्या आयुष्यात आहेत पण खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याची सुरुवात त्या मॅचपासून झाली”.
बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या ओवरमध्ये ११ रनांची आवश्यकता होती. पांड्या शेवटची ओवर होती. पहिल्या बॉलमध्ये महमदुल्लाह १ रन धावला. त्यानंतर दुसऱ्या बॉलला मुश्फिकुर रहीमने एक्स्ट्रा कवरवर शानदार चौकार मारला. तिसऱ्या बॉलवरपर फटका मारत चौकार मारला. यानंतर बांगलादेशला सामना काबीज करण्यासाठी ३ बॉलवर फक्त २ रन्स हवे होते. चौथ्या बॉलला १ रन मिळाला. शेवटच्या २ बॉलमध्ये २ रनांच्या आवश्यकता होती. पांड्याच्या ५व्या बॉलने कमाल केली आणि महमदुल्लाहने रविंद्र जडेजाच्या हातात कॅच देत आपला विकेट गमावला.
शेवटचा बॉल आणि बांगलादेशला विजयासाठी २ रन्स हवे होते. १ रनने मॅच टाय झाली असती. बांगलादेशला रोखण्यासाठी भारताला एकही रन देणं योग्य नव्हतं.पांड्याने शेवटचा बॉल टाकला. शुवग्ताच्या बॅटला बॉल लागतो ना लागतो तोच नॉन स्ट्राइकवर असलेला मुस्तफिजुर रनसाठी धावला. विकेटच्या मागे असलेला कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने मागे बॉल पकडला आणि थ्रो न करता तो पळत स्टंपकडे पोहोचत स्ंटपिंग केलं. निर्णय तिसऱ्या अंपायरकडे गेला. मुस्तफिजुर रहमानला रन आउट दिला गेला आणि भारताने १ रनने रोमांचक विजय संपादन केला. हार्दिक पांड्याने त्या ओवरमध्ये २ चौकार देवून सुद्धा ९ रन्सच दिले होते. ती मॅच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली.