Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स! कशी करावी तयारी? जाणून घ्या

राज्यभरात दहावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवून आवश्यक साहित्यच घेऊन जावे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 06:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यभरात बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना आणि परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन, शांत मन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उत्तम यश मिळवता येते. चला, जाणून घेऊया महत्त्वाच्या सूचना.

सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

परीक्षा केंद्रावर जाताना घ्यावयाची काळजी

परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडीचा विचार करून घरातून लवकर निघणे गरजेचे आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असते. उशीर झाल्यास अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो.

प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय आवश्यक साहित्य जसे की पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, मोजपट्टी, कंपास, लेखन पॅड आणि पाण्याची बाटली सोबत घ्यावी. परीक्षागृहात कोणतेही पुस्तक, वही, मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.

परीक्षा देताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत मन शांत ठेवा. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचा. एखादा प्रश्न अवघड वाटला तरी घाबरू नका आणि प्रश्न सोपा वाटला तरी घाई करू नका. वेळेचे योग्य नियोजन करून सर्व प्रश्न आत्मविश्वासाने सोडवा.

उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती जसे की आसन क्रमांक, विषय कोड इत्यादी अचूक आणि स्पष्ट लिहा. अक्षर सुवाच्य ठेवा. उत्तरपत्रिकेवर अनावश्यक लिहिणे किंवा खोडामोड टाळा. बारकोड चिकटवण्यापूर्वी तो आपलाच असल्याची खात्री करा.

काही अतिरिक्त सूचना

परीक्षेपूर्वी पुरेशी झोप घ्या आणि हलका आहार घ्या. शेवटच्या क्षणी घाईघाईने अभ्यास करण्यापेक्षा आधी केलेल्या तयारीवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार ठेवा आणि तणावापासून दूर राहा.

Job Alert : सरकारी भरतीच्या सुवर्णसंधी! बँकिंग तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

योग्य नियोजन, नियमांचे पालन आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने विद्यार्थी नक्कीच चांगले यश मिळवू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Web Title: How to do preparation for studies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Career
  • HSC
  • SSC

संबंधित बातम्या

Indian Navy Recruitment 2026: नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! घरबसल्या असा करा अर्ज?
1

Indian Navy Recruitment 2026: नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! घरबसल्या असा करा अर्ज?

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज
2

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा
3

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?
4

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.