Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC Net 2026: यूजीसी नेट अर्जदारांसाठी खूशखबर! करेक्शन विंडो सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा बदल

NTA UGC NET 2026 Correction Window: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यूजीसी नेट डिसेंबर २०२६ च्या अर्जात सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो सुरू केली आहे. उमेदवार ४ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या अर्जात आवश्यक तो बदल करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 02, 2026 | 03:29 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • यूजीसी नेट ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणते तपशील सुधारता येऊ शकतात?
  • कोणत्या तपशिलांमध्ये बदल करणे शक्य नाही?
  • यूजीसी नेट ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये सुधारणा कशी करावी? 
NTA UGC NET 2026 Correction Window: यूजीसी नेट डिसेंबर 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेची मुदत संपली आहे. फॉर्म भरताना काही चूक झाली असल्यास आता त्यात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध आहे, एनटीएने ऑनलाईन अर्जात सुधारणा करण्यासाठी करेक्शन विंडो सुरु केली आहे. फॉर्ममधील स्पेलिंगची चूक किंवा माहितीतील चुक भविष्यात मोठी समस्या ठरू शकते. म्हणून एनटीएने यात सुधारणा करण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

अनेकदा ऑनलाइन फॉर्म भरताना घाईत नाव आई वडिलांचे नाव किंवा इतर तपशिलांमध्ये टायपिंगच्या चुका होतात. ही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन एनटीएने स्पष्ट केले आहे की ठरवून दिलेल्या मुदतीत पोर्टलवर आवश्यक बदल करता येतील. यूजीसी नेटच्या करेक्शन विंडोद्वारे कोणते तपशील बदलता येऊ शकतात हे आता आपण जाणून घेणार आहोत.

यूजीसी नेट ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणते तपशील सुधारता येऊ शकतात?

उमेदवार त्यांच्या ऑनलाइन अर्जपत्रात आपले नाव, आपल्या वडिलांचे नाव किंवा आपल्या आईच्या नावापैकी कोणत्याही एका तपशिलामध्ये सुधारणा (रिवाज) करू शकतात.

कोणत्या तपशिलांमध्ये बदल करणे शक्य नाही?

मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, कायमस्वरूपी आणि तात्पुरता पत्ता (परमानेंट आणि प्रेझेंट ॲड्रेस), तसेच छायाचित्र (फोटोग्राफ) आणि स्वाक्षरी (सिग्नेचर – अपलोड केलेल्या इमेज) यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म सबमिट करताना या गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

NTA UGC NET २०२६: यूजीसी नेट डिसेंबर २०२६ चे अपडेट्स एनटीएच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहू शकता.

ONGC Apprentice Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये ३०४७ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; आजच करा अर्ज

यूजीसी नेट डिसेंबर २०२६ टाइमलाइन

  • करेक्शन विंडो सुरू होण्याची तारीख: २ नोव्हेंबर २०२६
  • करेक्शन करण्याची अंतिम तारीख: ४ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत)
  • अधिकृत वेबसाइट पोर्टल: https://ugcnet.nta.nic.in
  • हेल्पलाइन नंबर: 011-40759000
  • अधिकृत ईमेल आयडी: ugcnet@nta.ac.in

यूजीसी नेट ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये सुधारणा कशी करावी?

तुमच्या यूजीसी नेट डिसेंबर २०२६ च्या फॉर्ममध्ये नावाशी संबंधित कोणतीही चूक असेल आणि तुम्हाला ती दुरुस्त करायची असेल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
१. यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.nic.in वर जा.
२. होमपेजवर दिलेल्या ‘UGC-NET Dec 2026 Application Correction’ या लिंकवर क्लिक करा.
३. आता आपल्या ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने पोर्टलवर लॉग इन करा.
४. डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करा आणि त्यात दिलेल्या एडिट ऑप्शनवर जा.
५. नाव किंवा आई-वडिलांच्या नावामध्ये जी काही सुधारणा करायची आहे, ती काळजीपूर्वक अचूक भरा.
६. भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या, कारण त्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही.
७. शेवटी आपला फॉर्म फायनल सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी रिवाइज्ड पेजची प्रिंटआउट किंवा पीडीएफ सुरक्षित जपून ठेवा.

Teacher Dress Code 2026: शासनाचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी; ‘हा’ असेल नवीन ड्रेस

विद्यार्थ्यांसाठी विशेष सल्ला:

शेवटच्या वेळेची वाट पाहू नका: फॉर्ममध्ये करेक्शनसाठी ४ नोव्हेंबरच्या रात्री ११:५० वाजेपर्यंतची वेळ आहे. परंतु, शेवटच्या वेळेकडील सर्व्हरवरील गर्दी टाळण्यासाठी आज किंवा उद्याच करेक्शनचे काम पूर्ण करून घ्यावे.

दस्तावेजांशी पडताळणी करा: नाव किंवा आई-वडिलांचे नाव बदलताना खात्री करून घ्या की स्पेलिंग तुमच्या १० वीच्या किंवा पदवीच्या (ग्रॅज्युएशच्या) मार्कशीटशी तंतोतंत जुळत आहे.

सायबर कॅफेची काळजी: जर तुम्ही कोणत्याही कॅफेमधून फॉर्म दुरुस्त करून घेत असाल, तर सबमिट करण्यापूर्वी स्क्रीनवरील प्रत्येक स्पेलिंग अत्यंत काळजीपूर्वक तपासून घ्यावे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूजीसी नेट डिसेंबर २०२६ च्या अर्जात करेक्शन करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: अर्जात सुधारणा करण्यासाठीची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) ही आहे.

  • Que: करेक्शन विंडोद्वारे अर्ज फॉर्ममध्ये नेमके कोणते तपशील बदलता येऊ शकतात?

    Ans: या विंडोद्वारे उमेदवार केवळ स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा आईच्या नावापैकी कोणत्याही एका तपशिलामध्ये सुधारणा करू शकतात.

  • Que: अर्जात कोणत्या माहितीमध्ये बदल करण्याची परवानगी नाही?

    Ans: मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, कायमस्वरूपी व तात्पुरता पत्ता, तसेच अपलोड केलेले छायाचित्र (फोटोग्राफ) आणि स्वाक्षरी (सिग्नेचर) यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

Web Title: Ugc net december 2026 application correction window sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • competitive exam
  • Job
  • UGC net

संबंधित बातम्या

ONGC Apprentice Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये ३०४७ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; आजच करा अर्ज
1

ONGC Apprentice Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये ३०४७ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; आजच करा अर्ज

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज
2

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर
3

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?
4

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.