फोटो सौजन्य - Social Media
युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन (U PSC) ने नेशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA) 2 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली होती. निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर PDF फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. PDF मध्ये लिखित परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे रोल नंबर दिलेले आहेत, तसेच नाव देखील आहे.
ज्या उमेदवारांचे रोल नंबर PDF मध्ये दिसतील, त्यांना पुढील टप्पा म्हणजे सेवा चयन बोर्ड (SSB) इंटरव्यू आहे. इंटरव्यूसाठी उमेदवारांना भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर ते इंटरव्यूची तारीख, ठिकाण आणि कॉल-अप लेटर डाउनलोड करू शकतात.
NDA ची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होते: लिखित परीक्षा आणि SSB इंटरव्यू. लिखित परीक्षा एकूण ९०० गुणांची असते. दोन्ही टप्प्यातील कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाते. NDA 2 2025 साठी UPSC ने एकूण ४०६ रिक्त पदांची घोषणा केली आहे. ही पदे परीक्षा आणि इंटरव्यूच्या प्रक्रियेनंतर भरण्यात येणार आहेत. लिखित परीक्षेत उत्तम गुण असल्यास पुढे मुलाखतीला फायदा होईल. अतिशय सोप्या पद्धतीने हा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे. मुळात, Pdf असल्याने फार काही मोठी प्रक्रिया नाही आहे. अगदी घरामध्ये तुमच्या स्मार्ट फोनचा वापर करूनही हा निकाल तुम्ही पाहू शकता.
UPSC NDA 2 2025 निकाल कसा तपासावा:
UPSC च्या सूचना लक्षात घेऊन, उमेदवारांनी रिझल्टची एक कॉपी सुरक्षित ठेवावी आणि SSB इंटरव्यूसाठी वेळेत नोंदणी करावी. ही माहिती सर्व उमेदवारांसाठी खूप महत्वाची आहे कारण पुढील टप्प्यासाठी तयारी आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.