
फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांमध्ये AI चा वापर इतका वाढला आहे की त्यांना कोणत्याही सल्लागाराची गरज भासत नाहीये. अभ्यासासंबंधित अडचणी असो वा इतर कोणत्याही, ना त्यांना मित्र हवा आहे ना शिक्षक! ते पूर्णपणे AI वर आधारित झाल्याचे दिसून येत आहे. या संबंधित तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. मुळात, AI जरी सल्ला देण्यास समर्थ असला तरी त्याने दिलेला सल्ला हा भावनिक दृष्ट्या अयोग्य आहे. AI चा सल्ला पुरेसा नाही कारण त्यात फक्त लॉजिक आहे, भावना नाहीत!
मुळात, विद्यार्थ्यांकडून AI च्या होणाऱ्या अतिवापरामुळे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारा संवाद कमी होत चालला आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर सांगतात की एआयमुळे विद्यार्थ्यांचा तार्किक विचार आणि भावनिक विकास कमी होत चालला आहेर. विद्यार्थ्यंमध्ये तर्क लावण्याची क्षमता कमी झालीये. हे असच सुरु राहिलं तर विद्यार्थ्यांना विचार करणे कठीण तर जाईलच त्याच बरोबर विचार केलाच तरी त्यात भावनांची कमतरता जाणवेल.
दरम्यान, युनेस्कोने एक अवहाल जाहीर केला होता, त्यामध्ये असे नमूद आहे की २०२४ अखेरपर्यंत ७९ देशांनी शाळांमध्ये मोबाईल वापरावर मर्यादा घातल्या होत्या, जेणेकरून ते वैचारिक दृष्ट्याही स्वावलंबी बनतील. विद्यार्थ्यांचे असे तंत्रज्ञांवर आधारित राहणे याचा मानसिकरीत्या परिणाम होत आहे. ब्रेन रॉट, रागीटपणा, हट्टीपणा आणि तणावात वाढ झाली. मुळात, AI ला प्रश्न विचारण्याचा दर्जाचं ढासळला आहे. विद्यार्थ्यांकडून AI ला जास्तीत जास्त विचारले जाणारे प्रश्न म्हणजे ‘लक्ष केंद्रित कसे करावे, परीक्षेची भीती कशी कमी करावी, अभ्यास लक्षात राहत नसेल तर काय करावे? मुळात हा सल्ला शिक्षकांकडून घ्यायला हवा पण विद्यार्थी AI चा वापर करत आहेत.
यावर तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की “विद्यार्थ्यांनी एआयवर अवलंबून न राहता पालक, शिक्षक आणि समुपदेशकांसोबत संवाद साधावा. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यांच्या तणावावर उपाय शोधावा.”