
tech (फोटो सौजन्य: social media)
WhatsApp च्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्कांचा थेट आरोप – “WhatsApp सुरक्षित नाही”
मॅशेबलच्या अहवालानुसार, टेक ट्रान्सपरन्सी प्रोजेक्ट (TTP) च्या तपासणीत गुगल प्ले स्टोअरवर तब्बल ५५ तर अॅपल अॅप स्टोअरवर ४७ न्युडिफाय अॅप्स उपलब्ध असल्याचे उघड झाले आहे. डेटा अॅनालिटिक्स फर्म AppMagic च्या माहितीनुसार, या अॅप्सना जगभरात ७०५ दशलक्षांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.
या अॅप्समधून आतापर्यंत सुमारे ११७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९७० कोटी रुपये) कमावले गेले आहेत. विशेष म्हणजे, या कमाईतील काही हिस्सा कमिशनच्या स्वरूपात अॅपल आणि गुगल या दोन्ही कंपन्यांकडे जात असल्याने, या प्रकरणात दोन्ही टेक दिग्गजांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर कमाईचा अप्रत्यक्ष फायदा अॅपल आणि गुगललाही झाल्याचा आरोप होत आहे.
कारवाई काय?
टीटीपी अहवाल समोर आल्यानंतर, apple ने सीएनबीसीला सांगितले की त्यांनी असे २८ अॅप्स काढून टाकले आहेत. तर गुगलने म्हटले आहे की त्यांनी अनेक अॅप्स निलंबित केले आहेत आणि चौकशी सुरू आहे. मात्र टीटीपी स्पष्टपणे सांगते कि ही कारवाई पूर्णपणे अपुरी आहे. टीटीपीचा दावा आहे की या दोनी टेक दिग्गजांनी सार्वजनिक सुरक्षेबद्दल मोठे दावे करूनही , एआय डीपफेकचा गैरवापर रोखण्यात अपयशी ठरले आहेत. असे अॅप्स, जे महिलेच्या साध्या फोटोला पोर्नोग्राफिक प्रतिमेत रूपांतरित करू शकतात, त्यांच्या अॅप स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत यावरून त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
ग्रोक वादाचा विषय
एलोन मस्कच्या कंपनी xAI मधील एआय चॅटबॉट ग्रोक, डीपफेक पोर्नोग्राफिक प्रतिमा तयार करण्यासाठी जगभरात वादाचा विषय बनला आहे. या एआयचा वापर करून लोक फक्त टाइप करून इतरांच्या अश्लील प्रतिमा तयार करू शकत होते. एवढेच नाही तर ग्रोकला असे करण्यापासून रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. जेव्हा भारतासह जगभरातील विविध सरकारांकडून अल्टिमेटम मिळालं तेव्हा ग्रोकवर लगाम घालण्यात आला.
जर आकडेवाडीनुसार पाहायला गेलं तर केवळ ११ दिवसात ग्रोकचा वापर करून ३० लाखाहून अधिक लैंगिक दृष्ट्या स्पष्ट प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की जगभरातील सरकारांनी संमतीशिवाय तयार केलेल्या अश्लील प्रतिमांविरुद्ध कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. संमतीशिवाय तयार होणाऱ्या अश्लील डीपफेक प्रतिमा हा केवळ तांत्रिक गैरवापर नाही, तर महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि सुरक्षिततेवर थेट हल्ला आहे. यावर वेळीच कठोर कायदेशीर पावले उचलली नाहीत, तर एआय तंत्रज्ञान शस्त्रात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Samsung गॅलेक्सी झेड फ्लिप 7 ऑलिंपिक एडिशन सादर, एक्सक्लूसिव फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
Ans: AIच्या मदतीने साध्या फोटोमधून अश्लील/नग्न प्रतिमा तयार करणारे अॅप्स म्हणजे Nudify Apps.
Ans: कोणाच्याही फोटोचा गैरवापर करून अश्लील डीपफेक तयार होऊ शकतो, ज्यामुळे महिला सुरक्षेला मोठा धोका आहे.
Ans: Apple ने 28 अॅप्स हटवले, Google ने काही अॅप्स सस्पेंड केले; मात्र तज्ज्ञांच्या मते ही कारवाई अपुरी आहे.