फोटो सौजन्य - Social Media
देशात स्पर्धा खूप आहे. कोणत्याही क्षेत्रात जा, पैसे कमी आणि मेहनत जास्त आहे. पण त्यावाचून पर्यायही नाही. एक तर नोकरी करा आणि सुखी सुरक्षित आयुष्य जगा नाही तर व्यवसाय करा पण धाडस असेल तर. देशात विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा शालेय परीक्षांपासून भिन्न असतात, त्या कोणत्या? वाचा.
प्रवेश परीक्षेमध्ये JEE (Joint Entrance Examination), NEET (National Eligibility cum Entrance Test), CAT (Common Admission Test), CLAT (Common Law Admission Test). यांचा समावेश होतो. अभियांत्रिकी क्षेत्रात जाण्यासाठी JEE पात्र केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी NEET क्लिअर केली जाते. व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी CAT तर कायदा क्षेत्रात जाण्यासाठी CLAT पात्र केली जाते.
स्पर्धा परीक्षांमध्ये UPSC (Union Public Service Commission), MPSC (Maharashtra Public Service Commission), SSC (Staff Selection Commission) तसेच Banking Exams (जसे की IBPS, SBI PO, Clerk) चा समावेश होतो. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), पोलीस सेवा (IPS), परराष्ट्र सेवा (IFS) यांसारख्या उच्च दर्जाच्या सरकारी पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा म्हणजे UPSC. महाराष्ट्र राज्यातील सरकारी अधिकारी पदांसाठी MPSC परीक्षा पात्र करावी लागते. केंद्र सरकारमध्ये लिपिक, निरीक्षक किंवा लेखापाल होण्यासाठी SSC क्लिअर करावी लागते. बँकामध्ये नोकरी करायची असल्यास Banking Exams पात्र करावे लागतात.
काही विशेष परीक्षा घेतल्या जातात यामध्ये GATE (Graduate Aptitude Test in Engineering) तसेच CSIR-NET / UGC-NET चा समावेश आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एमटेक प्रवेश किंवा सरकारी क्षेत्रातील नोकरीसाठी आवश्यक परीक्षा म्हणजे GATE. तर संशोधन (Ph.D.) आणि विद्यापीठ प्राध्यापक पदांसाठी पात्रता ठरवणारी राष्ट्रीय परीक्षा म्हणजे CSIR-NET / UGC-NET.
संरक्षण क्षेत्रातील महत्वाची परीक्षा म्हणजे NDA / CDS (National Defence Academy / Combined Defence Services). भारतीय सेना, नौदल आणि वायुसेनेत अधिकारी होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा म्हणजे NDA / CDS.






