Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमांची सुरुवात, प्रवेशासाठी अर्ज सुरू

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, बासरी, तबला, सतार, पियानो वादन आणि संगीत निर्मिती अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 18, 2024 | 07:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाने संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना 23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ग. ल. तरतरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व इच्छुकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज प्रक्रिया www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://doaonline.co.in/LDMIC/ या लिंकवरून पूर्ण करता येईल. अर्ज करताना उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती घेत राहणे गरजेचे आहे.

Mahatransco भरती २०२४: ५०४ रिक्त जागांसाठी भरतीला सुरुवात होणार; शॉर्ट नोटीस जाहीर

संगीत महाविद्यालयाने सुरू केलेल्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता आणि उपयुक्तता राखण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे अध्यक्षपद प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांच्याकडे आहे, तर सदस्य म्हणून सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर आणि मयुरेश पै हे आहेत. महाविद्यालयाचे कला संचालनालयाचे संचालक संतोष क्षीरसागर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

महाविद्यालयात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, पियानो/कीबोर्ड वादन, संगीत निर्मिती, आणि ध्वनी अभियांत्रिकी असे विविध अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 25 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून, वार्षिक शुल्क 5400 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, सलिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी शनिवार-रविवार या दिवशी शिकवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली असून प्रवेश शुल्क 20,000 रुपये इतके आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील.

kinetic Green कडून विश्वकर्मा युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार; कौशल्‍य-आधारित प्रशिक्षण संशोधनाला दिली जाणार चालना

प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ऑडिशन प्रक्रिया आणि इतर माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी संकेतस्थळाला नियमित भेट देऊन अद्ययावत माहिती घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. संगीत क्षेत्रात भविष्य घडविण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम एक उत्तम संधी ठरणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमांसह महाविद्यालयाने विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने उत्कृष्ट शैक्षणिक पायाभूत सुविधा देण्याचा निर्धार केला आहे.

Web Title: Various courses start at bharat ratna lata dinanath mangeshkar international music college applications for admission open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 07:49 PM

Topics:  

  • Indian Classical Music

संबंधित बातम्या

साँग कंपोजर म्हणून करिअर कसं घडवावं? कमवाल बक्कळ पैसा आणि प्रसिद्धी
1

साँग कंपोजर म्हणून करिअर कसं घडवावं? कमवाल बक्कळ पैसा आणि प्रसिद्धी

Pandit Ravi Shankar: नृत्य सोडून बनले सितार वादक; वेश बदलून का केला संगीत क्षेत्रात प्रवेश? जाणून घ्या मनोरंजक प्रवास!
2

Pandit Ravi Shankar: नृत्य सोडून बनले सितार वादक; वेश बदलून का केला संगीत क्षेत्रात प्रवेश? जाणून घ्या मनोरंजक प्रवास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.