फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र स्टेस्ट इलेकट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ( Mahatransco )ने भरतीबद्दल महत्वाची सुना जारी केली आहे. मुळात, विद्युत विभागात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे यातून नियुक्ती मिळवून उमेदवारांना परराज्यात किंवा परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र स्टेस्ट इलेकट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ( Mahatransco )ने या भरतीच्या संदर्भात महत्वाची सूचना जाहीर केली आहे कि लवकरच संस्थेतील ५०४ रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. अद्याप, भरतीची तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. तसेच कोणत्याही तारखा जाहीर करण्यात आल्या नाही आहेत. महत्वाची गोष्ट इतकीच कि या भरतीबाबत असणारी अधिकृत अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेस्ट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ( Mahatransco )च्या या भरतीसाठी अर्ज करू पाहणार्या उमेदवारांनी लवकरच या भरतीचा लाभ घ्यावा.
या भरतीला अद्याप सुरुवात झाली नाही आहे. ऑनलाईन स्वरूपात या भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. एकंदरीत, उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. राज्यातून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. या भरतीमध्ये सुपरिन्टेंडिंग इंजिनिअर (Civil)च्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. एकजिक्यूटिव्ह इंजिनिअर (Civil)च्या पदासाठी ४ जागा रिक्त आहेत. ऍडिशनल एकजिक्यूटिव्ह इंजिनिअर च्या पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. डेप्युटी एकजिक्यूटिव्ह इंजिनिअरच्या पदासाठी ७ जागा रिक्त आहेत. तसेच असिस्टंट इंजिनिअर (Civil)च्या पदासाठी १३४ जागा रिक्त आहेत.
तसेच असिस्टंट जनरल मॅनेजरच्या (F&A) पदासाठी १ जागा रिक्त आहे. सिनिअर मॅनेजर( F&A)च्या पदासाठीदेखील १ जागा रिक्त आहे. मॅनेजर (F&A)च्या पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. २५ जागा डेप्युटी मॅनेजर पदासाठी तर ३७ जागा अप्पर डिव्हिजन क्लार्कसाठी रिकामी आहे. तर २६० उमेदवारांची नियुक्ती लोवर डिव्हिजन क्लार्कसाठी करण्यात येणार आहे. सेक्युरिटी & एन्फोर्समेंन विभागामध्ये असिस्टंट चीफ सेक्युरिटी ऑफिसर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. तर ज्युनिअर सेक्युरिटी ऑफिसर पदासाठी केवळ ३ जागा रिक्त आहेत.
कसे करावे अर्ज?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. यासाठी उमेदवारांनी संबंधित अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल. सध्या, अर्ज करण्यासाठी विंडो अद्याप खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाइटवरील “Career & Job Opening/Recruitment Notifications” या विभागाला भेट द्यावी. तसेच, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, आणि अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.