Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: वॉलमार्टमध्ये मोठे व्यवस्थापन बदल; अमेरिकेतील प्रमुख पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती

Career News: जगातील आघाडीची किरकोळ विक्री कंपनी वॉलमार्टने अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी काईल किनार्ड यांची नियुक्ती जाहीर केली आहे

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 24, 2026 | 03:56 PM
Walmart Appoints Kyle Kinnard as New CEO of Walmart (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Walmart Appoints Kyle Kinnard as New CEO of Walmart (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

International News: जगातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्री साखळ्यांपैंकी एक असलेल्या वॉलमार्टमध्ये आता मोठे बदल झाले आहेत. आता कंपनीने अमेरिकेतील मुख्य कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदावर नवीन नियुक्ती जाहीर केली.

काईल किनार्ड पदभार स्वीकारतील

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे कीरन शनाहान आता कंपनीतून बाहेर पडणार आहेत. त्यांच्या जागी सध्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची जबाबदारी सांभाळणारे काईल किनार्ड हे पदभार स्वीकारतील. हा निर्णय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फर्नर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या व्यापक व्यवस्थापन फेरबदलाचा भाग मानला जात आहे.

काईल किनार्ड कोण आहेत?

काईल किनार्ड हे वॉलमार्टसाठी गेली 25 वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचारी आहेत. त्यांनी कंपनीत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, आरोग्य सेवा विभागापासून ते आंतरराष्ट्रीय व्यवसायापर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचा आणि ग्राहकांच्या गरजांचा त्यांना मोठा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर आता त्यांच्याकडे अशी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. (Career News:)

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…

यापुर्वी त्या पदावर कोण-कोण होते तर..

गेल्या काही महिन्यांत वॉलमार्टमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर अनेक बदल झाले. यापूर्वी सॅम्स क्लबचे प्रमुख टॉम वॉर्ड आणि अमेरिकेतील स्टोअर ऑपरेशन्सचे वरिष्ठ अधिकारी सेड्रिक क्लार्क यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच लॅटिन अमेरिकेतील व्यवसायासाठीही स्वतंत्र नेतृत्वाची जबाबदारी नव्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.

Freelancers आणि व्यावसायिकांसाठी खुशखबर! ‘या’ आयकर नियमामुळे होऊ शकते मोठी करबचत

वॉलमार्ट सध्या केवळ पारंपरिक किरकोळ विक्रीवर अवलंबून न राहता तंत्रज्ञानावर आधारित सेवा वाढवण्यावर भर देत आहे. ऑनलाइन मार्केटप्लेस, घरपोच डिलिव्हरी आणि डिजिटल सेवांचा विस्तार करून अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचे कंपनीचे धोरण आहे. विशेषतः जास्त खरेदी क्षमता असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करत कंपनी आपल्या सेवांमध्ये सातत्याने बदल करत आहे.

मात्र, जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम किरकोळ विक्री क्षेत्रावरही दिसून येत आहे. ग्राहकांचा खर्च कमी होत असल्याने अनेक कंपन्यांप्रमाणे वॉलमार्टलाही सावध भूमिका घ्यावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने यापूर्वी काही पदे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर वार्षिक विक्री आणि नफ्याबाबतही कंपनीने संयमी अंदाज कायम ठेवला आहे.

Web Title: Walmart appoints kyle kinnard as new ceo of walmart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Business News
  • international news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.