
फोटो सौजन्य - Social Media
आशा भोसले यांचे शिक्षण किती?
गायिका आशा भोसले यांचे शिक्षण फार नव्हते. त्यांच्या सुरुवातीचे शिक्षण ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत झाले पण पुढे त्यांचे वडील पंडित. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी पूर्ण वेळ संगीतावर लक्ष देण्याचे ठरवले. एकंदरीत, आशा भोसले यांचे संपूर्ण शिक्षण संगीतातच झाले आहे आणि संगीतातील त्यांचे पहिले गुरु हे त्यांचे वडील पंडित. दीनानाथ मंगेशकर होते. जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नाही.
जरी शिक्षण झाले नसले तरी आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रात कळस गाठला होता. त्यांनी त्यांच्या साहित्य अभ्यासावरून तसेच योगदानावरून University of Amravati आणि University of Jalgaon मधून Doctorates मिळवली. तसेच University of Salford मधून पदवीचा अभ्यास केला आणि पदवीधर झाल्या. त्या जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या ‘Doctor of Literature’ (D.Litt.) प्राप्तकर्त्या होत्या.
आशा भोसले यांनी आतापर्यंत किती गाणी गायलीत?
आशा भोसले यांनी एकूण 12,000 पेक्षा जास्त गाणी गायले आहेत. आशा भोसले यांनी देशातील जवळजवळ सगळ्याच भाषेत गायन केले आहे.