फोटो सौजन्य: iStock
जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपसूकच आपले नातेवाईक आपल्याला ‘मोठा होऊन डॉक्टर हो’ असा सल्ला देत असतात. तर काही वेळेस मुलांना प्रश्न विचारला जातो की ते मोठे झाल्यावर काय बनतील. यावर अनेक मुले डॉक्टर होणार असे सहज उत्तर देतात. कितीतरी पालक परस्पर ठरवून टाकतात की त्यांची मुलं पुढे मोठी होऊन डॉक्टरच होतील. पण जसजसे मुले मोठी होऊ लागतात, तसतसे समजते की डॉक्टर होणे ही किती अवघड गोष्ट आहे.
डॉक्टर होणे हे खूप सन्मानाचे काम आहे. तसेच हे एक समाजसेवेचे कार्य असून याशिवाय डॉक्टर आर्थिकदृष्ट्याही भक्कम असतात. पण डॉक्टर होणं सोपं काम नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. खूप अभ्यास करावा लागतो. जेव्हा एखादा तरुण डॉक्टर होतो, तेव्हा तो क्षण फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांसाठी देखील लाख मोलाचा क्षण असतो. दरवर्षी देशात लाखो डॉक्टर्स घडत असतात.
एचडीएफसी बँक PO भरती 2025: पदवीधरांसाठी उत्तम Vacancy, त्वरित करा अर्ज
भारतात डॉक्टर होण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. ज्यामध्ये दरवर्षी लाखो उमेदवारांचे अर्ज येतात. त्यापैकी मोजकेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात आणि पुढे अभ्यास करून डॉक्टर बनतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की भारतातील कोणते राज्य सर्वाधिक तरुण डॉक्टर घडवते आणि या राज्याला डॉक्टरांचा कारखाना का म्हणतात? चला या राज्याबद्दल जाणून घेऊया.
भारतात एमबीबीएससाठी सर्वाधिक प्रवेश कर्नाटकातील तरुण घेत असतात. तसेच देशातील बहुतांश तरुण डॉक्टर होण्यासाठी कर्नाटकातून येतात. भारतात एमबीबीएसच्या सर्वाधिक जागा कर्नाटकात आहेत. राज्यसभेत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कर्नाटकात एमबीबीएसच्या अंदाजे 11745 जागा आहेत. जी भारतातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. आणि याच कारणामुळे बहुतांश डॉक्टर कर्नाटकातून येतात. कर्नाटकला डॉक्टरांची फॅक्टरी असेही म्हणतात.
इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर या यादीत तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये एमबीबीएसच्या एकूण 11650 जागा आहेत. तर या यादीत आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे जिथे एमबीबीएसच्या 10845 जागा उपलब्ध आहेत.
जेथे एमबीबीएसच्या जागांच्या बाबतीत कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्र दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर उत्तर प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे जिथे एमबीबीएसच्या एकूण 9903 जागा आहेत. तेलंगणा पाचव्या क्रमांकावर आहे जिथे एमबीबीएसच्या एकूण 8490 जागा आहेत. गुजरात सहाव्या स्थानावर आहे जिथे एमबीबीएसच्या एकूण 7150 जागा आहेत. आंध्र प्रदेश सातव्या स्थानावर आहे, येथे एमबीबीएसच्या 6485 जागा उपलब्ध आहेत. राजस्थान आठव्या स्थानावर आहे, येथे एमबीबीएसच्या एकूण 5575 जागा आहेत. मध्य प्रदेश 9व्या स्थानावर आहे, तिथे एमबीबीएसच्या 4800 जागा आहेत. बिहार 10 व्या स्थानावर आहे, तेथे एमबीबीएसच्या 2765 जागा आहेत.