
math
Why No Nobel Prize for Math: नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, जो भैतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रांमध्ये दिला जातो, परंतु एक मोठा प्रश्न नेहमीच लोकांना पडतो की गणित विषयाला यामध्ये समाविष्ट का केले नाही , चला तर मग जाणून घेऊया
या प्रश्नाचे उत्तर अल्फेड नोबेल यांनी मध्ये लिहलेल्या मृत्युपत्रात दडलेले आहे, त्यांनी आपल्या पुरस्कारांच्या यादीत गणिताचा उल्लेख केला नव्हता,कारण त्त्या काळात नोबेल यांनी अशा क्षेत्रांना प्राधान्य दिले ज्यांचा थेट मानवी जीवनावर व्यवहारिक प्रभाव पडतो, याच कारणामुळे या प्रतिष्ठित यादीतून गणित विषयाला वगळण्यात आले.
अनेक इतिहासकारांचे मत होते की अल्फेड नोबेल यांनी गणिताला महत्त्व दिले नाही कारण गणित त्या काळात सैद्धांतिक विज्ञान मानले जात होते, त्याचा थेट प्रभाव मोजणे कठीण होते, म्हणूनच याचा यादीत समावेश करण्यात आला नाही, म्हणूनच गणितासाठी नोबेल पारितोषिकाची उणीव भरून काढण्यासाठी त्यानंतरच्या काळात दोन मोठे पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्यामधला पहिला “फील्ड्स मेडल” (Fields Medal), जो १९३६ मध्ये सुरू करण्यात आला याला गणितातील सर्वात मोठा सन्मान असून हा पुरस्कार दर चार वर्षांनी ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या गणिततज्ञाना दिला जातो, दुसरा आहे “एबेल पुरस्कार” (Abel Prize), जो २००३ मध्ये नॉर्वे सरकारने सुरू केला हा पुरस्कार नोबेल पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो, या दोन्ही पुरस्कारांनी गणिताला जागतिक पातळीनवर सन्मान केला जातो.
जरी गणितासाठी स्वतंत्र नोबेल पुरस्कार दिला जात नसला तरी त्याचा प्रभाव अनेक नोबेल श्रेणींमध्ये स्पष्टपणे दिसून येतो, अनेक नोबेल विजेत्यांनी आपल्या संशोधनात गणितीय सिद्धांताचा आधार घेऊन महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत, अशा प्रकारे गणित अप्रत्यक्षपणे नोबेल पुरस्कारांमध्ये समाविष्ट आहे, आजच्या काळातही गणितालाही गणित हे जगातील प्रत्येक वैज्ञानिक संशोधनाचा कणा मानला जाते. त्याचे महत्त्वही सातत्याने वाढत आहे.