फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
Scientist Jobs: भारताच्या संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) वैज्ञानिक पदांवर भरतीसाठी अर्ज (DRDO Recruitment) मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण ३३ रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये सायंटिस्ट ‘सी’ (Scientist C)च्या २० जागा सायंटिस्ट ‘डी’ (Scientist D) च्या ११ जागा आणि सायंटिस्ट ‘ई’ (Scientist E) च्या २ जागांचा समावेश आहे. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेद्वारांसाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वदेशी संरक्षण क्षमतेशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.तरी इच्छुक उमेद्वारांनी १९ जून २०२६ रोजी ४ संध्याकाळपर्यंत आरएससीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा.
सायंटिस्ट ‘सी’ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. निवड झाले्लया उमेद्वावारांना ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा ६७,७०० रुपये मूळ वेतन (बेसिक सॅलरी) मिळेल. याशिवाय सरकारी नियमानुसार इतर भत्ते आणि सोयी सुविधाही दिल्या जातील.
सायंटिस्ट ‘डी’ या पदासाठी उमेदवारांकडे किमान सात वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ७८,८०० रुपये बेसिक सॅलरी मिळेल तर सायंटिस्ट ‘ई’ या पदासाठी किमान ११ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, या पदासाठी ही कमाल वयोमर्यांदा ४५ वर्ष निश्चित करण्यात आली असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा मूळ १,२३,१०० वेतन असेल जे या भरतीमधील सर्वात आकर्षक पॅकेज आहे.
Why Teachers Use Red Pen: पेपर तपासताना शिक्षक लाल पेन का वापरतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण!
इच्छुक उमेदवार ‘रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटर’ (RAC) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आपली पात्रता अनुभव आणि वयोमर्यादे संदर्भातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.डीआरडीओ ही देशातील सर्वोच्च संरक्षण संशोधन संस्था आहे.जिथे काम करणे ही प्रतिष्ठा आणि जबाबदारीचे प्रतिक मानले जाते.






