फोटो सौजन्य - Social Media
कॉमन ऍडमिशन टेस्ट (CAT) २०२४ परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. दरम्यान, हे निकाल आज जाहीर होईल असे सांगितले जात आहे. मुळात, देशातील टॉपच्या बिजनेस स्कुलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CAT ची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CAT उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही CAT ची परीक्षा दिली असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी iimcat.ac.in या CAT च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. आपल्या निकालाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी लॉगिन क्रेडिशिअल लक्षात घ्यावे. यामध्ये युजर आयडी आणि पासवर्डचा समावेश आहे.
अशा प्रकारे पाहता येणार निकाल
CAT २०२४ परीक्षा २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. देशभरातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते. दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. उमेदवारांना सल्ला दिला जातो कि भविष्यातील लागणाऱ्या गरजेसाठी स्कोरकार्ड डाउनलोड करून ठेवावा. IIM किंवा इतर ठिकाणी असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी हा निकाल महत्वाचा दस्तऐवज आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, IIM आपापल्या पुढील फेरीसाठी शॉर्टलिस्ट वैयक्तिक स्वरूपात प्रसिद्ध करतील, ज्यामध्ये लेखी पात्रता चाचणी (WAT), गट चर्चा (GD), आणि वैयक्तिक मुलाखत (PI) यांचा समावेश असेल. CAT गुण आणि इतर निकष, जसे की शैक्षणिक कामगिरी आणि कार्याचा अनुभव, यांना दिले जाणारे महत्त्व वेगवेगळ्या संस्थांमध्ये भिन्न असते.
कॉमन ऍडमिशन टेस्ट (CAT) परीक्षेसाठी गुणांकन पद्धती विशेष आहे. परीक्षेत दिलेल्या योग्य उत्तरासाठी उमेदवाराला ३ गुण दिले जातात. परंतु, जर उत्तर चुकीचे असेल, तर त्या चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जातो. ही गुणांकन पद्धती परीक्षेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांना आपल्या प्रत्येक उत्तराची योग्य काळजी घेऊनच उत्तर देण्याचा सल्ला दिला जातो. CAT परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, याबाबत अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर माहिती उपलब्ध होईल. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालाविषयी अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी या संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.