Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Youngest Professor: १८ वर्षाचा मुलगा कसा बनला कॉलेजमध्ये प्रोफेसर? जाणून घ्या जगातल्या सर्वात तरुण प्राध्यापकाची यशोगाथा..

World Youngest Professor Nathan Thomas : ज्या वयात मुले कॉलेजमध्ये शिकायला जातात, त्याच वयात १८ वर्षांच्या एका तरुणाने कॉलेजमध्ये प्रोफेसर बनून ३०६ वर्षे जुना विक्रम कसा मोडला आणि जगात नवा इतिहास रचला? जाणून घ्या नॅथन थॉमसचा हा थक्क करणारा आणि प्रेरणादायी प्रवास..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 04, 2026 | 01:21 PM
nathan

nathan

Follow Us
Follow Us:

World Youngest Professor Nathan Thomas : नाथन थॉमस यांची कथा अशा तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे, जे कमी वयात मोठी स्वप्ने पाहतात आणि ती पूर्ण करण्याचे वेड बाळगतात. ज्या वयात बहुतांश विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण सुरू करतात, त्या वयात नॅथन कॉलेजमध्ये शिकवत होते. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील राहणाऱ्या नॅथन यांनी १८ वर्षे ३४६ दिवस वयात कॉलेजचे प्राध्यापक बनून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. यासह त्यांनी ३०६ वर्षे जुना विक्रम देखील मोडीत काढला आहे.

नॅथन बनले जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक

नॅथन यांची मियामी डेड कॉलेजमध्ये अभियांत्रिकी इन्स्ट्रक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. येथे ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग आणि तांत्रिक विषय (टेक्निकल सब्जेक्ट्स) शिकवतात. विशेष म्हणजे, त्यांच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी वयाने त्यांच्याच वयाचे आहेत. तरीही नॅथन यांचे असे मानणे आहे की, शिकण्याची इच्छा ही वयापेक्षा खूप महत्त्वाची असते. नॅथन यांनी अतिशय लहान वयातच असाधारण प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली होती.

वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी त्यांनी शालेय शिक्षणा,सोबतच कॉलेजचे शिक्षणही सुरू केले. यानंतर त्यांनी फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी (ग्रॅज्युएट्स) आणि पोस्ट ग्रॅज्युएशची पदवी सन्मानासह पूर्ण केली. याच वेगवान शैक्षणिक प्रवासाने त्यांना विद्यार्थ्यापासून शिक्षकापर्यंत पोहोचवले.

UGC National Scholarship 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! यूजीसीकडून दोन नवीन राष्ट्रीय स्कॉलरशिप जाहीर, असा घ्या लाभ

इंजिनिअरिंगचे कुटुंब आणि शिकवण्याची वेगळी आवड

नॅथन अशा कुटुंबातून येतात जिथे आधीपासूनच इंजिनिअरिंगचे वातावरण होते. बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानात रुची होती. ते सांगतात की, त्यांच्या आई गणिताचे अवघड कन्सेप्ट्स सोप्या पद्धतीने समजून सांगत होत्या. याच कारणामुळे त्यांना शिकवण्याची प्रचंड आवड निर्माण झाली. विद्यार्थ्यांना एखादा कठीण विषय समजून घेताना पाहणे हा त्यांच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो.

अध्यापनासोबतच कायद्याचे (लॉ चे) शिक्षण

इंजिनिअरिंग शिकवण्यासोबतच नॅथन युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षणही घेत आहेत. भविष्यात त्यांना बौद्धिक संपदा कायदा या क्षेत्रात काम करायचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन शोधांना कायदेशीर संरक्षण मिळवून देण्याच्या क्षेत्रात योगदान देणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.

Padmashri Dr. D.Y. Patil: शिक्षणाचा यज्ञ पेटवणारे शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांचे शैक्षणिक कार्य…

तरुणांसाठी एक मोलाचा धडा

नाथन थॉमस यांची ही यशोगाथा हे सिद्ध करते की, वय ही कधीही सर्वात मोठी अट नसते. चिकाटी, जिज्ञासा आणि सातत्याने शिकण्याची इच्छा माणसाला असाधारण उंचीवर नेऊन पोहोचवू शकते. कॉलेजमध्ये एक विद्यार्थी म्हणून प्रवेश करण्यापासून ते जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास लाखो विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रेरित करतो.

Web Title: World youngest professor nathan thomas guinness record marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • education
  • Engineering College
  • Professor Jobs

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
2

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
3

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
4

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.