Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

75 टक्के गुण मिळूनही दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; घरी कोणी नसल्याची संधी साधली अन्…

सकाळी दूधवाला घरी आल्यानंतर बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शंका आली. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला असता कावेरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने खाली उतरवण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 08:17 AM
इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

Follow Us
Follow Us:

रामटेक : नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रामटेकजवळील शीतलवाडी येथील शिवनगर परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कावेरी कमलाकर बोरसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी ही मनसर येथील प्रोव्हिडन्स विद्यालयाची विद्यार्थिनी होती. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तिला ७५ टक्के गुण मिळाले होते. तिचे वडील सैन्यात कार्यरत असून, ते सकाळी ड्युटीवर गेले होते. तर आई तालुका कृषी विभागात कार्यरत असल्याने त्या शेतभेटीसाठी बाहेर गेल्या होत्या. घरात कावेरी एकटीच होती. याच दरम्यान सकाळी सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास तिने घरातील बाथरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, सकाळी दूधवाला घरी आल्यानंतर बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शंका आली. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला असता कावेरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

बोरसे कुटुंब चार दिवसांपूर्वीच रामटेकला

मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील असलेले बोरसे कुटुंब चार दिवसांपूर्वीच रामटेक येथे आले होते. कावेरीला दोन बहिणी असून त्या मूळ गावीच थांबल्या होत्या. कावेरी मात्र आई-वडिलांसोबत रामटेकला आली होती.

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट

पतीने केली पत्नीची हत्या

दुसऱ्या एका घटनेत, आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतरच पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला ज्यानंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. श्रीकाकुलममध्ये राहणाऱ्या तेजश्रीचे दोन महिन्यांआधी विशाखापट्टणममधील अरगोलू येथील निवासी दप्पा सोमेश्वर राव याच्याशी लग्न झाले होते. पतीने पैशांच्या हव्यासापोटी पत्नीची निघृण हत्या केली आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचे सर्वांना भासवले. माहितीनुसार, तिच्या शरीरावर मिळालेल्या जखमांवरुन हत्येचा हा कट उघडकीस आला.

Web Title: 10th standard student commits suicide incident in ramtek nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
2

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
4

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.