नागपूरच्या जरीपटका भागात घरविक्रीच्या वादातून शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी मंगेश भिमटे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. हल्लेखोर फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.
नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी कारमध्ये खास खाचा करून गांजा लपवणाऱ्या ओडिशातील चार तस्करांना अटक केली. स्टेपनीच्या जागेतून २९ किलो गांजा जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ममता ही रॅकेट चालवत होती. ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला आणि तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायात ढकलत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या एएचटीयूला मिळाली.
नागपूरमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तंशू नागपुरेचा मृत्यू, तर ऋतिक पटले गंभीर जखमी झाला.…
सुरुवातीला २२५ टन हरभरा यशस्वीरित्या पुरवून शेखने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला. यासाठी पन्नालाल यांनी जबलपूरच्या अंकिता इंडस्ट्रीजच्या खात्यात ९३ लाख रुपये जमा केले होते.
काका-पुतण्यांच्या मालमत्ता वादात झालेल्या गोळीबारात निष्पाप विजय म्यानावार (३७) जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देवतळे बंधूंवरही गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी आहे.
कळमना येथील पार्वतीनगरात दारू पिताना झालेल्या वादातून प्रेयसीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने टोळक्याने चाकू व रॉडने हल्ला केला. यात २२ वर्षीय ऋतिक पटलेचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.
दक्षिण नागपूरमध्ये आई-वडिलांनीच 12 वर्षांच्या मुलाला साखळी–कुलूप लावून घरात कोंडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चाईल्ड हेल्पलाइनच्या तक्रारीनंतर बाल संरक्षण कक्षाने हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली.
नागपुरात दाबो पबमध्ये तरुणीशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून दोन गटांत वाद झाला. पबबाहेर हा वाद विकोपाला जाऊन दगड, लोखंडी रॉड व चाकूने हल्ला झाला. यात प्रणय नन्नावरेचा मृत्यू, तर मित्र…
नागपूरच्या उमरेड येथील गांगापूर कालवा परिसरात दारूच्या नशेत शेजाऱ्याने किरकोळ वादातून माय-लेकीवर लाकडी दांड्याने हल्ला करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.
नागपुरात धक्कादायक घटना! शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना आठवीच्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूहल्ला झाला. जखमी विद्यार्थ्यावर मेयो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अल्पवयीन असण्याची शक्यता.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात शेतीची सीमा, विहीर व पाण्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर गोळीबार करून हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
नागपूरच्या प्रतापनगर परिसरातील उर्वशी बारमध्ये उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून स्थानिक गुंडांनी थरार माजवला. धारदार शस्त्रे व रॉडने अवघ्या अडीच मिनिटांत बार उद्ध्वस्त केला. CCTVत संपूर्ण प्रकार कैद; पोलिस तपास सुरू…
काही वेळेपर्यंत त्यांच्यात सामान्य चर्चा झाली. तिघेही दारूच्या नशेत होते. अचानक काही गोष्टीवरून त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. प्रीतने गाडीतून चाकू काढत आदित्यच्या गळ्यावर वार केला.
सावनेर तालुक्यातील माळेगाव येथे युवा महिला कबड्डीपटू किरण दाढेने नोकरीचे आमिष व मानसिक छळ सहन करत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी पती स्वप्नील लांबघरेवर गुन्हा दाखल.
अग्रवाल यांचा कपडे आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. बोमा शहरातील कुख्यात आणि वादग्रस्त सट्टेबाज आहे. अजय शर्मा नामक मित्राच्या माध्यमातून अग्रवाल यांची ओळख बोमाशी झाली होती.
आरोपी पैशांचे आमिष दाखवून त्या मुलीकडून देहव्यापार करून घेत होते. पोलिसांनी प्रतिमा आणि किरण दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेमंतची प्रेयसी अमनच्या मैत्रिणीची मैत्रीण आहे. त्यामुळे अमितसोबतही तिची चांगली मैत्री झाली होती. अमनला याबाबत समजले आणि त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. तो दोघांच्या भेटीगाठीमुळे नाराज होता.