हृदयद्रावक! वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाईल दिला नाही; 15 वर्षांच्या मुलाने घेतला 'हा' भयानक निर्णय
सांगली: सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी मोबाइल न दिल्याने 15 वर्षांच्या मुलाने आपले जीवन संपवले आहे. सदर मुलगा इयत्ता नववीत शिकत होता. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल न घेऊन दिल्याने अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आपले आयुष्य संवपले आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर मुलाचा एक दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. या दिवशी त्याने आपल्या आईकडे नवीन मोबाइल फोनची मागणी केली होती. मात्र आईने काही अडचणींमुळे मोबाइल घेऊन देण्यास नकार दिला. मात्र आईने आपला हट्ट पूर्ण न केल्याने 15 वर्षांच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे. सदर मुलाने जीवन संपवल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
सांगलीत अशी धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अठरा वर्षांच्या खालील मुलांच्या मोबाइल आणि इंटरनेट वापरावर राज्य शासनाने बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. सोशल मिडिया आणि रील्सच्या अतिआहारी गेल्याने आशा घटना घडत आहेत का याचा विचार केला जाणे आवश्यक आहे. मात्र 15 वर्षांच्या मुलाने केवळ मोबाइल न मिळाल्याने आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबवर मोठा आघात झाला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तीन निष्पाप मुलांना गळफास लावून आईची आत्महत्या
उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका आईने तीन निष्पाप मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी मयताची सासू खोलीत गेली असता आतील दृश्य पाहून तिने आरडाओरडा केला. दुसरीकडे, माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतकाचा पती फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा: तीन निष्पाप मुलांना गळफास लावून आईची आत्महत्या; दारू पिऊन पती करायचा मारहाण
कोतवाली गावातील भदोही गावात ही घटना घडली. येथे राहणारे संदीपकुमार गौतम हे मजुरीचे काम करतात. शुक्रवारी (20 डिसेंबर) सायंकाळी दारूच्या नशेत त्याने पत्नीला मारहाण केली. यामुळे दुखावलेल्या पत्नीने तीन निरागस मुलांसह रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी उशिरापर्यंत ती बाहेर न आल्याने सासू खोलीत गेल्या. जिथे निरागस मुलांसह सुनेचा मृतदेह फासावर लटकलेला पाहून तिने आरडाओरडा केला. आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यही खोलीत पोहोचले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच प्रशासनात घबराट पसरली. ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवले. तीन निष्पाप मुलांसह आईने गळफास लावून आत्महत्या केली, दारू पिऊन नवरा रोज मारहाण करायचा
प्रतापगड येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.