Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; सासू-सूनेचा मृत्यू तर…

नांगोळे-ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचे घर आहे. घरामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील व काजल समीर पाटील यांच्यासह दोन लहान मुले राहतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 10:41 AM
! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. नांगोळे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सांगलीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय ४५) असे मृत सासूचे, तर काजल समीर पाटील (वय ३०) असे सुनेचे नाव आहे. अल्लाउद्दीन मकबूल पाटील (वय ५५) आणि समीर अल्लाउद्दीन पाटील (वय ३५) या पिता-पुत्राची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबातील दोन बालके मात्र सुखरूप आहेत. नांगोळे-ढालगाव रस्त्यालगत पाटील कुटुंबीयांचे घर आहे. घरामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील व काजल समीर पाटील यांच्यासह दोन लहान मुले राहतात.

हेदेखील वाचा : Beed crime News : बीडमध्ये चाललंय तरी काय? तरुणाला दोन दिवस ठेवलं डांबून, अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी दुपारी शेजारील वृध्द महिला पाटील यांच्या घरी आली असता, चौघेही निपचिप पडलेले दिसले. तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये पाहणी केली असता, चार ग्लास आढळले.

घरात आढळले औषध

तसेच कापून ठेवलेला लिंबू आणि सुरी व बाजूला जनावरांसाठी वापरले जाणारे औषध आढळून आले. त्यामुळे चौघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. समीर पाटील यांना सहा वर्षांचा एक आणि दोन महिन्यांचा एक, अशी दोन मुले आहेत. सुदैवाने ही दोन्हीही मुले बचावली. सर्वांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, रमेजा पाटील आणि काजल पाटील यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती समजताच जत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, निरीक्षक जोतिराम पाटील यांनी तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात तसेच नांगोळे येथे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, पाटील कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबतचे कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी दिली.

Web Title: Four members of same family attempt suicide in kavathemahankal sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • crime news
  • Sangli Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण
1

वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट; “मार खाणारा तो पठारे मी नव्हे” ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण

मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई! अवघ्या 12 तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक
2

मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई! अवघ्या 12 तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…
3

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…

Gautami Patil: तरुणांना घायाळ करणारी गौतमी हमसून हमसून रडली; म्हणाली, “हे घडले तेव्हा…”
4

Gautami Patil: तरुणांना घायाळ करणारी गौतमी हमसून हमसून रडली; म्हणाली, “हे घडले तेव्हा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.