crime (फोटो सौजन्य: social media)
सांगली: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रेकॉर्डवरील गुंडांचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. हत्या झालेल्या कुख्यात गुंडांचे नाव रोहित पंडित पवार असे आहे. रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता. त्यातूनच ही हत्या झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.
सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार; अनेक गुन्हे दाखल होताच अखेर पोलिसांनी…
शुक्रवारी रोहित पवार हा कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठलं. रोहितला त्याच्यावर हल्ला होणार याची कुणकुण लागलीच होती. म्हणून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर आणि डोक्यात वार केले. डोक्यात वार केल्यावर ते हत्यार रोहितच्या डोक्यातच रुतून बसले होते. त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल (शुक्रवारी) दुपारी घडली. कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसारात तिघा जणांच्या टोळक्याने पोलीस रेकॉर्डवरील गुंड असलेल्या रोहितचा पाठलाग केला. डोक्यात आणि मानेवर धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खून केला. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिसात हजार झाले आहेत. त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या चौकशीतून एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. रोहित पंडित पवार (23, रा. बेघर वसाहत, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे, इस्लामपूर) असे हत्या झालेल्या गुंडांचे नाव आहे. तर हौसेराव कुमार आंबी (वय 21, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) आणि दोन अल्पवयीन विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ओंकार राजेंद्र गुरव याने फिर्याद दिली आहे.
मृतक रोहित पवार हा गुंडप्रवृत्तीचा होता. त्याच्यावर एकूण पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. पैश्याच्या कारणातून तो अनेकांना त्रास देत होता. हल्लेखोरांना तो नेमीचं खुन्नस देत होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी सुरु होती. त्यातून हल्लेखोर हे रोहितचा मार्ग काढण्याच्या तय्यारीत होते. अखेरीस त्याची धारधार शाश्त्राने हल्ला करत त्याची हत्या केली.
Crime News : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला