वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक
यवतमाळ : मेडिकल इन फार्मसी पदविकेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तसेच नाममात्र कन्सल्टन्सी शुल्क घेण्याचे आश्वासन देत दोन भामट्यांनी एका विद्यार्थ्याच्या पालकाची तब्बल ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मागील ३ जुलै रोजी वडगाव रोड परिसरातील महाबली नगर येथे घडली होती. मात्र, याप्रकरणी शुक्रवारी (दि.८) तक्रार दाखल करण्यात आली.
सुनील शामराव काळे (वय ६१, रा. साईनाथ सोसायटी, वडगाव) असे फसवणूक झालेल्या पालकाचे नाव आहे. तर सुलतान खान (रा. चंपारण, बिहार) आणि संतोषकुमार (रा. सिमदेगा, झारखंड) अशी आरोपींची नावे आहेत. काळे यांच्या मुलाला डिप्लोमा इन फार्मसीला यंदा शैक्षणिक प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी येथील स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थेची निवड केली होती. तेथे प्रवेश घेण्यासाठी संबंधित दोन भामट्यांनी काळे यांच्याशी संपर्क साधला. शिवाय नाममात्र कन्सल्टन्सी शुल्क आकारून त्यांच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
हेदेखील वाचा : Akola News: धक्कादायक! अकोल्यात सरकारी रुग्णालयात रुग्णांना नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं
त्यावरून त्यांनी विविध बाबींसाठी वेळोवेळी धनादेशाच्या माध्यमातून ३ लाख १० हजार रूपये दिले. त्यानंतर मात्र बराच अवधी उलटला तरी त्यांच्या मुलाला प्रवेश मिळाला नाही. काळे यांनी वारंवार संबंधित २ भामट्यांशी संपर्क साधला. प्रत्येक वेळी ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यातयाप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून संबंधित २ भामट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
संभाजीनगरमध्ये पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न
दुसऱ्या एका घटनेत, छत्रपती संभाजीनगरमधून संतापजनक घटना समोर आली आहे. 4 बीएचकेऐवजी 2 बीएचके फ्लॅट घेऊन देण्यासाठी तगादा लावलेल्या मुलीच्या सासरच्यांना समजावयाला आलेल्या सासूदेखत जावयाने पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती सासू साऱ्यांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन विष्णू ढाकणे असे आरोपी पतीचे नाव आहे.