अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यामध्ये चक्क मृत पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक ३२ वार्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. त्यांनी नाश्त्याच्या पोह्याची प्लेट रुग्णालय बाहेरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून आणली होती, त्यामध्ये हे हे पालीचं मुंडकं आढळल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेल’ला मळमळ आणि उलटी झाली होती. हा मुद्दा आता अकोल्यात चांगलाच चर्चेत आला आहे.
Bhandara Crime News : भंडारा हादरलं! दोन गटात अस्तित्वाच्या लढाईतून धारधार शस्त्राने दोघांची हत्या
हा प्रकार वैधकीय अधिकाऱ्यांना कळवला मात्र अध्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई झाली नाही. नागरिकांनी बाहेर उघड्यावर काही खात असाल तर सतर्कता बाळगावी, अन्न अथवा जे काही बाहेरून खाण्यासाठी घेत असाल तर तपासूनच खावे असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे. तर शेख सोहेल यांनी अग्रवाल रेस्टॉरंटमधून खरेदी केल्याचा आरोप अग्रवाल रेस्टॉरंटनं फेटाळला आहे. मात्र सोहेलला हे कांदेपोहे खाल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेलला मळमळ आणि उलटी झाली होती. म्हणून या घटनेनंतर त्या रेस्टॉरंटवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नातवानेच केली आजीची हत्या; आई वडीलदेखील जखमी; पैश्यासाठी केला वार
बीडच्या परळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैश्यासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेलय आई- वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या आजीला परळीहून आंबाजोगाईला उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या आजीचं नाव जुबेदा इब्राहिम कुरेशी (वय 80) असं मृत्यू झालेल्या आजीचं नाव आहे. हल्ला करणारा नातू हा केवळ २० वर्षाचा होता. आरोपी नातवाचा नाव रमजान कुरेशी असं आहे. ही घटना तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात घडली. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक; 60 हजारांचा मुद्देमाल जप्त






