Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात महिलांवर होणाऱ्या ४६,४५९ गुन्ह्यांची नोंद पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ

महिला व मुलींच्या सुरक्षिततेविषयी हाकाट्या सुरू असल्या आणि त्यासाठी कडक कायदे करण्याची भाषा बोलली जात असली तरी जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेली बालक आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी धक्कादायक

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2025 | 09:28 AM
crime (फोटो सौजन्य- pinterest)

crime (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत. तर दुसरीकडे महिला व मुलींच्या सुरक्षिततेविषयी हाकाट्या सुरू असल्या आणि त्यासाठी कडक कायदे करण्याची भाषा बोलली जात असली तरी नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेली बालक आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी धक्कादायक आहे. सन २०२४ मध्ये बालकांवरील अत्याचाराच्या २२ हजार ७५८ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. तर याच वर्षात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ४६ हजार ४५९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही आकडेवारी नुसती चिंता वाढवणारी नाही तर बालक आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही

मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा, बाल संरक्षण युनिट्स, बालकल्याण समित्या, जनजागृती यासारख्या अनेक उपाययोजना शासन स्तरावरून होत असताना देखील बालकांवरील होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ व्हावी ही बाब चिंताजनक आणि अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे. सन २०२३ मध्ये राज्यातील बालकांवरील झालेल्या गुन्ह्यांची नोंदवलेली संख्या २१ हजार ८०२ इतकी असताना सन २०२४ मध्ये ती संख्या वाढवून २२ हजार ५७८ इतकी झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. खुनाचे गुन्हे २०२३ मध्ये ८४ होते ते २०२४ मध्ये ११ ने वाढून ९५ इतके झाले. तर अर्भक हत्या सहा वरून अकरावर पोहोचल्या. सन २०२३ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे ४५९४ इतके गुन्हे नोंदविले गेले. ती संख्या २०२४ मध्ये वाढून ४६५० वर पोहोचली. अपहरण व पळवून नेण्याचे गुन्हे २०२३ मध्ये १२ हजार ५६४ होते ते २०२४ मध्ये १२६७१ इतके नोंदविण्यात आले. तर इतर प्रकारचे गुन्हे जे २०२३ मध्ये ४५०३ नोंदविण्यात आले त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन ५१०३ इतके नोंदविण्यात आले.

  • गेल्या काही वर्षातील स्त्रियांवरील अत्याचार निर्मूलनासंबंधी जागतिक पातळीवरील राबविल्या जाणाऱ्या मोहिमा या स्त्रियांवरील अत्याचाराची उग्रता व त्या विषयाच्या गांभीर्याचा निदर्शक आहेत. राज्यासह देशातील स्त्रियांवर होणारे अत्याचार ही एक गंभीर समस्या आहे.
  • राज्यातील स्त्रियांना त्यांच्या सर्व मूलभूत हक्कांची शाश्वती देणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक जनजागृती व जाणीव वृद्धिंगत करण्याबरोबरच फौजदारी न्याय व्यवस्थेकडून कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

नातेवाईकांकडून क्रूर कृत्ये
राज्यातील स्त्रियांना त्यांच्या सर्व मूलभूत हक्कांची शाश्वती देणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक जनजागृती व जाणीव वृद्धिंगत करण्याबरोबरच फौजदारी न्याय व्यवस्थेकडून कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ४६ हजार ४५९ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये बलात्कार ७ हजार ९४०, अपहरण व पळवून नेणे ८८३ गुन्हे, हुंडाबळी १३९, पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये १० हजार ५३९ गुन्हे, विनयभंग व लैंगिक छळ १७ हजार ६७१, अत्याचार १५९ तर अनैतिक व्यापार व इतर ११२८ गुन्ह्यांची नोंद २०२४ मध्ये करण्यात आली. सन २०२३ च्या मानाने या अत्याचाराच्या संख्येत काहीशी घट दिसत असली तरी मागील तीन-चार वर्षांच्या आकडेवारीवरून नजर टाकल्यास हे अत्याचाराचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे.

Web Title: 46459 crimes against women reported in the state increase in atrocities against women in progressive maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • crime
  • Shocking incident

संबंधित बातम्या

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
1

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
2

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना
4

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.