mehul choksi (फोटो सौजन्य- social media)
भारतीय चौकशी संस्था ईडी आणि सीबीआय यांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी भगोडा हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला ताब्यात घेतले आहे. परंतु त्याला भारतात परत आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. चोक्सीवर १३,५०० कोटी रूपयांचा बँकिंग फ्रॉड केल्याचा आरोप आहे आणि त्याच्यावर मनीलॉड्रिंगचेही आरोप आहेत. या घोटाळ्यात नीरवची पत्नी एमी मोदी आणि त्याचा भाऊ नीशल मोदी हे देखील आरोपी आहेत. ट्रायल टाळण्यासाठी चोक्सी भारतातून पळून गेला होता. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या चोक्सीने अँटीगृहाचे नागरिकत्व घेतलेले आहे. त्याच्याविरूद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती, परंतु त्याने असे सांगून ती नोटीस रद्द केली होती की, भारतीय चौकशी संस्था त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही नोटीस कोणतेही आंतरराष्ट्रीय अटकेचे वॉरंट नाही, तर ती अनुरोध करणा-या देशाने इंटरपोलच्या माध्यमातून जारी केलेला एक आंतरराष्ट्रीय अलर्ट आहे, जो प्रत्यार्पण, आत्मसमर्पण किंवा अन्य कायदेशीर कारवाई प्रलंबित ठेवण्यासठी संबंधित व्यक्तिचा ठावठिकाणा शोधण्यास आणि तात्पुरती अटक करण्यास मदत करतो.
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा रुग्णालयांना धक्का; बाळ चोरीला गेल्यास….
मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित
चोक्सीला मुंबईच्या न्यायालयाने २०१८ आणि २०२१ मध्ये जारी केलेल्या दोन गैरजामीन वॉरंटच्या आधारावर अटक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो बेल्जियममधील तुरूंगातच राहील, परंतु त्याचे प्रत्यार्पण इतके सोपे नाही. चोक्सीचा भगोडा भाचा नीरव मोदी २०११ पासून लंडनच्या तुरूंगात आहे. चोक्सी इंग्लंडच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन आपले प्रत्यार्पण थांबविण्याचा प्रयत्न करेल. भारताने शखात्र व्यापारी संजय भंडारीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती, परंतु, इंग्लंडच्या हायकोर्टाने असे सांगून ते नाकारले की, भारतातील तुरूंगाची स्थिती अत्यंत खराब आहे. बेल्जियमच्या न्यायालयामध्येही मानवाधिकाराच्या मुद्यांवर संवेदनशीलता आहे. म्हणूनच चोक्सीचे प्रत्यार्पण बेल्जियमच्या न्यायालयात भारतीय तुरूंगाच्या स्थितीबद्दल काय दृष्टिकोन स्वीकारला जातो यावर अवलंबून आहे. प्रत्यार्पणाविरोधात मानवाधिकाराचे मुद्दे उचलले जातात. चोक्सी वारंवार बेल्जियमला जात आहे, याच आधारावर सहा महिन्यापूर्वी इंडीने बेल्जियमच्या अधिकारऱ्यांकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. याचाच परिणाम म्हणून चोक्सीला अटक झाली आहे. त्याला आता भारतात परत आणणे महत्वाचे आहे. भारतीय चौकशी संस्थांनी या संदर्भातील सर्व कागदपत्रे आधीच तयार केली असून ती प्रत्यार्पणाच्या विनंतीसह प्रस्तुत केली आहेत.
हजारो कोटी रूपयांचा कर्ज घोटाळा
चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रूपयाने फसविले आहे. चौकशी संस्था हळूहळू त्याच्यापर्यंत पोहचत आहेत. चोक्सी २०१८ मध्ये फरार झाला होता. त्याने अँटीगुआ आणि बारबुडा येथे आश्रय घेतला आणि नंतर अँटीगुआचे नागरिकत्व देखील मिळविले. ईडी अँटीगुआ आणि बारमुडा येथे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. चोक्सीला जून २०२१ मध्ये डॉमिनिकवरून परत आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाल होता. तो अँटीगुआत संशयास्पद परिस्थितीत पोहचला होता. चोक्सीने अटक टाळण्यासठी स्वीत्झरलंडला पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आजारामुळे रूग्णालयात दाखल व्हावे लागले आणि बेल्जियममध्येच थांबावे लागले. चोक्सीने अजूनही भारत किंवा अँटीगुआचे नागरिकत्व सोडले नाही, चोक्सीविरोधात भारताची केस खूप मजबूत आहे, तरीही त्याचे प्रत्यार्पण करणे सोपे नाही. सर्वकाही यावरच निर्भर आहे की, बेल्जियमच्या न्यायालयाने भारतीय तुरूंगाबद्दल काय दृष्टिकोन स्वीकारलेला आहे.