
'तू मला आवडत नाहीस' म्हणत पतीने चार मुलांसह पत्नीला घराबाहेर काढले; कल्याणमधील कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक
मिळालेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या मुस्तफा चौधरी यांच्याशी रुकसार चौधरी यांचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार मुले आहेत. मात्र, आता पतीने आपल्याला मुलांसह घराबाहेर काढल्याचा आरोप रुकसार यांनी केला आहे. ‘आईने शपथ दिली होती म्हणून तुझ्याशी लग्न केले, तू मला आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचे नाही,’ असे पती सांगत असल्याचा पीडितेने सांगितले.
घरातून बाहेर काढल्यानंतर चार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी रुकसार यांच्यावर आली आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना भीक मागावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या हक्कासाठी जेव्हा त्या सासरी जातात, तेव्हा सासरच्या मंडळींकडून त्यांना आणि त्यांच्या मुलांना मारहाण केली जात असल्याचं त्यांनी सांगितले.
या कथित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. व्हिडिओमुळे संबंधित घटनेची चर्चा सुरू झाली असून, पीडित महिलेने आपल्याला आणि आपल्या मुलांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपांवरून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, केवळ गुन्हा दाखल करून न थांबता आरोपींविरोधात ठोस कारवाई करावी, अशी मागणी रुकसार चौधरी यांनी केली आहे. तसेच आपल्याला आणि आपल्या चारही मुलांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. १६ वर्षांचा संसार, चार लेकरांची जबाबदारी आणि आता न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष… रुकसार चौधरी यांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Ans: कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
Ans: १६ वर्षांच्या संसारानंतर पतीने चार मुलांसह घराबाहेर काढल्याचा आणि सासरच्या मंडळींकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Ans: मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.