Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Crime: विमा-सेसपोटी ५२.४८ लाख रुपये वसूलपात्र; ७९.५० कोटींच्या कचरा प्रकल्पाच्या निविदेवर लेखापरीक्षणाचे गंभीर आक्षेप

सांगलीतील कचरा व्यवस्थापनाच्या तब्बल ७९.५० कोटींच्या कामावर लेखापरीक्षणाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशिष्ट कंपनीला काम मिळावे, अशा पद्धतीने निविदा राबविल्याचा आक्षेप घेतल्याने महापालिकेच्या कारभारावर संशयाची छाया निर्माण झाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 14, 2026 | 09:43 AM
Sangali Crime: विमा-सेसपोटी ५२.४८ लाख रुपये वसूलपात्र; ७९.५० कोटींच्या कचरा प्रकल्पाच्या निविदेवर लेखापरीक्षणाचे गंभीर आक्षेप

Sangali Crime: विमा-सेसपोटी ५२.४८ लाख रुपये वसूलपात्र; ७९.५० कोटींच्या कचरा प्रकल्पाच्या निविदेवर लेखापरीक्षणाचे गंभीर आक्षेप

Follow Us
Follow Us:
  • ७९.५० कोटींच्या कचरा प्रकल्पाच्या निविदेवर लेखापरीक्षणाचे आक्षेप
  • एकमेव निविदाधारक आणि अवास्तव दरावर प्रश्न
  • १९.४७ कोटींच्या वाढीव खर्चाची कागदपत्रे नाहीत
सांगली: सांगली महापालिकेच्या समडोळी रोड आणि मिरज-बेडग रोड कचरा डेपोतील जुन्या साचलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासह दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या तब्बल ७९.५० कोटी रुपयांच्या कामांवर लेखापरीक्षण अहवालात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया विशिष्ट कंपनीला काम मिळावे, अशा पद्धतीने राबविल्याचे दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. निविदेतील अटी, एकमेव निविदाधारक, दर आणि तांत्रिक गुणांकनासह ठेकेदाराच्या पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. समडोळी रोड आणि मिरज-बेडग रोड कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी ३६ कोटी १३ लाख १३ हजार ६६७ रुपये, तर दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी ४३ कोटी ३६ लाख ६० हजार २६९ रुपये खर्च प्रस्तावित होता. या दोन्ही कामांचा एकूण खर्च ७९.५० कोटी रुपये आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ६० कोटी २ लाख ७५ हजार २६९ रुपयांची मान्यता असल्याचे लेखापरीक्षणात नमूद आहे. मात्र, वाढीव १९ कोटी ४६ लाख ९८ हजार ६६७ रुपयांच्या खर्चासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने ही रक्कम आक्षेपाधीन ठरविण्यात आली आहे.

हेही वाचा:स्टॉक रजिस्टर प्रकरणाने सावंतवाडी पालिकेत खळबळ; ‘मोठे मासे लपले आहेत’ नगरसेविकांचा आरोप

दैनंदिन कचरा प्रक्रियेच्या निविदेवर आक्षेप

दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ४३.३६ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदेत अत्यंत क्लिष्ट आणि विशिष्ट स्वरूपाच्या अटी व शर्ती ठेवण्यात आल्याचे लेखापरीक्षणात नमूद आहे. या अटी एखाद्या विशिष्ट निविदाधारकाला पात्र करण्याच्या उद्देशाने तयार केल्या असाव्यात, असा गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेला स्पर्धात्मक दराचा लाभ मिळाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या कामासाठी एकमेव निविदाधारकाचा आर्थिक लखोटा उघडल्यानंतर ७७२ रुपये प्रति मेट्रिक टन दर प्राप्त झाला. त्यानंतर वाटाघाटी करून हा दर ७२० रुपये करण्यात आला. जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठी ४१९ रुपये प्रति टन आणि दैनंदिन कचरा प्रक्रियेसाठी ७२० रुपये प्रति टन दर निश्चित करण्यात आला. हे दर अवास्तव असल्याचेही लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे.

३६ कोटींच्या कामाच्या पात्रतेवर प्रश्न

जुन्या साचलेल्या कचऱ्याच्या बायोमायनिंगसाठीच्या ३६.१३ कोटींच्या निविदेत समडोळी आणि मिरज-बेडग रोड डेपोतील सुमारे ८ लाख ४२ हजार २२३ घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन होते. या निविदेत ‘कृष्णा ग्रीन’ आणि ‘झिग्मा ग्लोबल’ सहभागी झाल्याची नोंद आहे. कृष्णा ग्रीन ही भागीदारी संस्था असून तिच्या तांत्रिक व आर्थिक पात्रतेसाठी ‘भूमी ग्रीन’ची कागदपत्रे सादर करण्यात आली. कृष्णा ग्रीन ही भूमी ग्रीनची एसपीव्ही असल्याचे दाखविण्यासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करण्यात आल्याचे लेखापरीक्षणात नमूद आहे. मात्र, निविदेच्या अटी-शर्तींमध्ये एसपीव्हीचा समावेश नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. कृष्णा ग्रीनकडे घनकचरा व्यवस्थापनाचा पूर्वानुभव, वित्तीय पात्रता आणि भागभांडवल दिसून येत नसतानाही सुमारे ३६ कोटींचे काम देण्यात आल्याचे दिसते, असा गंभीर आक्षेप लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आला आहे. याशिवाय कामगार विमा आणि सेसची कमी कपात केल्याप्रकरणी ४१.८८ लाख रुपये, तर दैनंदिन कचरा प्रक्रिया कामातील विम्याच्या कमी कपातीपोटी १०.६० लाख रुपये, असे एकूण ५२.४८ लाख रुपये वसूलपात्र ठरविण्यात आले आहेत.

Web Title: 5248 lakh recoverable on account of insurance cess no documentation for 1947 crore in additional expenditure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:43 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.