Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

6 वर्षीय मुलीकडे मुख्याध्यापकाची शारीरिक संबंधाची मागणी, मुलीने नकार दिला अन् अखेर….

गेल्या काही दिवसांपासून महिल्यावरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता गुजरातमध्ये सहा वर्षीय चिमुकुलीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी दुसरं तीसरं कोणी नसून चक्क मुख्यध्यापकाने हा गुन्हा केल्याचे समोर आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2024 | 02:09 PM
6 वर्षीय मुलीकडे मुख्याध्यापकाची शारीरिक संबंधाची मागणी, मुलीने नकार दिला अन् अखेर....

6 वर्षीय मुलीकडे मुख्याध्यापकाची शारीरिक संबंधाची मागणी, मुलीने नकार दिला अन् अखेर....

Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधील दाहोदमध्ये दोन दिवसांपूर्वी एका प्राथमिक शाळेतील मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलगी पहिल्याच्या वर्गात शिकत होती. तपासादरम्यान पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली. मुख्याध्यापकांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मुलीने याला विरोध केल्यावर तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह स्वतःच्या गाडीत ठेवला. संधी साधून तो शाळेच्या मागे फेकून दिला. अटक केल्यानंतर मुख्याध्यापक बहाणा करू लागला पण नंतर त्याने या हत्येचीकबुली दिली.

इयत्ता 1 च्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्याच्या प्रयत्नांना शाळेच्या मुख्याध्यापकाने विरोध केल्याने तिचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर त्याने मुलीचा मृतदेह शाळेच्या आवारात फेकून दिला आणि तिची बॅग आणि शूज वर्गाजवळ फेकून दिले. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक 55 वर्षीय गोविंद नाट याला अटक केली आहे.

सुट्टी संपूनही मुलगी घरी परतली नाही

ही घटना दाहोदच्या सिंगवाड येथील तौरानी प्राथमिक शाळेत घडली असून या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव गोविंद नाट असे आहे. ही तरुणी सिंगवड तालुक्यातील पिपळ्या गावची रहिवासी होती. मुलगी सहा वर्षांची होती. ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती आणि शाळा संपूनही ती घरी परतली नव्हती. तेव्हा तिचे कुटुंबीय तिच्या शोधात शाळेत गेले. शाळेत पोहोचल्यावर त्यांना कुलूप दिसले. त्यांनी आपल्या मुलीचा आजूबाजूला शोध घेतला असता शाळेच्या पाठीमागील आवारात ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. मुलीला अशा अवस्थेत पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दुचाकीवरून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

गळा दाबून हत्या

पोलीस दाहोदचे एसपी राजदीप सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून शाळेच्या मुख्याध्यापकाच्या शोधासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. एसपी म्हणाले की, मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून त्यात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. दरम्यान दाहोद जिल्ह्यातील सहा वर्षीय विद्यार्थ्यांनीची हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला शाळेचा मुख्याध्यापक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचा असल्याचा दावा गुजरात काँग्रेसने सोमवारी केला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी राजदीप सिंह झाला यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी ६ वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्या शाळेच्या आवारात आढळून आला. त्यावेळी मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते, पोस्टमार्टम अहवालात मुलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी 10 पथके तयार केली. मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, ती दररोज प्राचार्य गोविंद नाट यांच्यासोबत शाळेत जात असे. पोलिसांनी मुख्याध्यापकांशी बोलले असता, त्याने सांगितले की, मुलीला शाळेत सोडण्यासाठी तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता.

दरम्यान प्राचार्य गोविंद नाट यांच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. घटनेच्या दिवशी गोविंद नाट यांच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता तो त्या दिवशी उशिरा शाळेत पोहोचल्याचे त्यांना समजले. त्याच्याकडे चौकशी केली असता मुख्याध्यापकाने जघन्य गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, गुरुवारी सकाळी 10.20 च्या सुमारास त्याने मुलीला तिच्या घरातून उचलले. तिच्या आईने तिला मुख्याध्यापकांच्या गाडीत बसवले, पण ती शाळेत पोहोचली नाही. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी याला दुजोरा दिला.

अटकेनंतर धक्कादायक खुलासा

शाळेत जात असताना मुख्याध्यापकाने वाटेत चालत्या कारमध्ये मुलीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा सुरू केला. मुलीला ओरडण्यापासून रोखण्यासाठी प्राचार्यांनी तिचा गळा दाबला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. शाळेत पोहोचल्यावर मुख्याध्यापकांनी मुलीचा मृतदेह आपल्या गाडीत टाकला आणि गाडीला कुलूप लावले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याने मृतदेह शाळेच्या इमारतीच्या मागे फेकून दिला आणि शाळेची दप्तर व शूज तिच्या वर्गाबाहेर ठेवले. पोलिसांनी गोविंद नाटला अटक केली असून त्याच्यावर कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 6 year old girl strangled by gujarat school principal after failed assault attempt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 02:09 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Shegaon News: शेगाव तालुक्यात घडला गैरप्रकार! मंदिराची केली तोडफोड, मूर्तीची केली विटंबना
1

Shegaon News: शेगाव तालुक्यात घडला गैरप्रकार! मंदिराची केली तोडफोड, मूर्तीची केली विटंबना

Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!

Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल
3

Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल

Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार
4

Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.