Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार

चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथील घर क्रमांक 517 मध्ये एकटी राहत असलेल्या मंदा प्रमोद म्हात्रे (वय 70) या वृद्ध महिलेचा जबरी चोरीदरम्यान खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 29, 2026 | 02:11 PM
Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार
Follow Us
Follow Us:
  • आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….;
  • अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार
अलिबाग : चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथील घर क्रमांक 517 मध्ये एकटी राहत असलेल्या मंदा प्रमोद म्हात्रे (वय 70) या वृद्ध महिलेचा जबरी चोरीदरम्यान खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून माहिती मिळताच रेवदंडा पोलीस, श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) माया मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं

काय घडले नेमके?

मंदा म्हात्रे या गेल्या सुमारे दहा वर्षांपासून माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी टेकाळकर आळी येथील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे नवगाव येथे वास्तव्यास आहेत.

28 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पती-पत्नींचा फोनवर संपर्क झाला होता. मात्र सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मंदा म्हात्रे यांचा फोन उचलला जात नसल्याने संशय बळावला. दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे 8 वाजता फिर्यादी प्रमोद म्हात्रे घरी आले असता घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.

घरात प्रवेश केल्यानंतर मंदा म्हात्रे या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.झटापटीचे स्पष्ट चिन्हपोलिसांच्या प्राथमिक पाहणीत त्यांच्या डाव्या कानाखाली जखम आढळून आली असून मानेच्या उजव्या बाजूला दोन वळ (खुणा) दिसून आल्या आहेत. कानातील सोन्याच्या रिंगा व गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दागिने लुटताना झालेल्या झटापटीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

या प्रकरणी फिर्यादी प्रमोद शांताराम म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/2026 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम103/1 311 व 331(7) अन्वये नोंद करण्यात आला असून जबरी चोरी करताना खून झाल्याचा गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव, दीपक म्हशीळकर, DySP माया मोरे, मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, कुंभार, सुग्रीव गव्हाणे, सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे.एकटी वृद्ध महिला हेरून घरात घुसून तिचा जीव घेण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Drugs Case : अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी संशयाच्या भोवऱ्यात; सहभाग कोणा-कोणाचा? तपास सुरू

Web Title: Police investigate murder of woman while stealing in alibaug

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • alibaug crime
  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.