Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shegaon News: शेगाव तालुक्यात घडला गैरप्रकार! मंदिराची केली तोडफोड, मूर्तीची केली विटंबना

गजानान महाराजांचं स्थान म्हणून शेगावला महत्व मोठं आहे. याच शेगावमध्ये नवनाथ महाराजांच्या मुर्त्यांची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 29, 2026 | 07:05 PM
Shegaon News: शेगाव तालुक्यात घडला गैरप्रकार! मंदिराची केली तोडफोड, मूर्तीची केली विटंबना
Follow Us
Close
Follow Us:
  • शेगाव तालुक्यात घडला गैरप्रकार!
  • मंदिराची केली तोडफोड, मूर्तीची केली विटंबना
गजानान महाराजांचं स्थान म्हणून शेगावला महत्व मोठं आहे. याच शेगावमध्ये नवनाथ महाराजांच्या मुर्त्यांची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तालुक्यात हिंगाणा वैजनाथ या ठिकाणी नवनाथांचं मंदिर आहे. या मंदिरात काही अज्ञतांनी या ठिकाणी तोडफोड केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. काल सकाळच्या सुमारास या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संवेदनशील वातावरण निर्माण झालं आहे.

हिंगणा वैजनाथ या परिसरात शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरातील अंबादास नामदेव धुईकर या शेतकऱ्याने (वय 70) पोलिसात तक्रार दिली . धुईकर यांच्या शेतात असलेल्या मंदिरात नवनाथांच्या एकूण नऊ मूर्ती, दत्त गुरुंची मूर्ती, महादेवाची पिंड आणि इतर देवी-देवतांचे फोटो ठेवण्यात आलेले आहेत. या मंदिराची पूजा नियमितपणे अंबादास धुईकर करून मंदिर बंद केले जात असे.

फिर्यादींच्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता त्यांनी नियमित पूजा करून मंदिर बंद केले. मात्र, काल सकाळी 8 वाजता मंदिर उघडल्यावर लक्षात आलं की नवनाथ महाराजांच्या सर्व नऊ मूर्तींची डोकी तोडली गेली आहे. याशिवाय दत्त भगवान आणि इतर देवतांच्या मूर्तींना देखील नुकसान पोहोचलेले आढळले.

Mumbai Crime: महिलांसमोर ढकललं, अपमान झाला, मालाड स्टेशनवरील प्राध्यापक हत्येमागचं कारण आरोपीने उघड केलं

अंबादास धुईकर यांनी ही घटना तात्काळ गावचे पोलीस पाटील यांना कळवली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पोलीसांनी तात्काळ पंचनाम्यास सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराबाबत नागरिकांची चौकशी देखील करण्यात आली. लवकरात दोषींना योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे संपूर्ण गावात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिरातील मूर्ती तोडल्यामुळे धार्मिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या. त्यामुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. गजानन महाराजांच्या पवित्र भूमीत जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा ते अतिशय लाजिरवाणं आहे.

शेगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही घटनास्थळी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, शेजारील नागरिकांचे बघितलेले विवरण व इतर पुरावे गोळा करून दोषी ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” पोलिसांचा सर्थीचा तपास सुरु आहे. त्यामुळे दोषी लवकरात लवरात समोर येईल.

Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल

Web Title: Shegaon misconduct occurred in shegaon taluka temple vandalized idol desecrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Buldhana
  • crime news

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: सिल्लोडमध्ये कत्तलखान्यावर छापा; दीड लाखांचे गोमांस जप्त, रक्ताचा सडा पाहून पोलीसही चक्रावले!

Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल
2

Crime News: अपघातानंतर दुचाकीस्वाराने पर्यटकाला केली मारहाण; गुन्हा दाखल

Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार
3

Alibaug Crime : आधी सोन्याचे दागिने लंपास केले आणि मग….; अंगावर काटा आणणारा हत्येचा थरार

गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी
4

गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.