घाटात विवाहितेचा मृतदेह आढळला, डोक्यात लोखंडी हत्याराने वार
पुणे : बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत अंदाजे २८ ते ३० वयाच्या एका विवाहित युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून, अन्य ठिकाणी घातपात करीत सेफ झोन मानल्या गेलेल्या डंपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व खंडाळा पोलीस, शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने मृतदेह दरीतून काढत खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डाॅ. वैशाली कडूकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने भेट देत पाहणी केली. यावेळी संबंधित विवाहित युवतीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने पाच ते सहा वार केले असल्याचे स्पष्ट झाले असून, वार वर्मी बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल शेळके हे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : बस चालकाचा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला; कोल्हापूर बसस्थानकातील प्रकार
ट्रकचालकास निदर्शनास आला मृतदेह
बेंगरुटवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील एक वळणालगत एक मालट्रक बंद पडल्याने संबंधित मालट्रकवरील चालक हे मालट्रक दुरुस्त करीत असताना व त्या ठिकाणी दुरुस्तीकरीता यंञज्ञ येण्यासाठी उशिर लागणार असल्याने चालक कठड्याच्या बाजूला उग्र वास आल्याने चालकाचे खंबाटकी घाटातील दरीत लक्ष गेल्याने त्याठिकाणी एक महिलेचा मृतदेह दिसून आला असता त्यांनी तत्काळ खंडाळा पोलीसांशी संपर्क साधला.
3 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळला
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली उल्हानगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बेपत्ता असलेल्या 3 वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला. हिललाईन पोलीस ठाण्यामागील प्रेमनगर टेकडी परिसरात एक मृतदेह आढळून आला असून, या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. उल्हासनगरमधील प्रेमनगर टेकडी एक महिला तिच्या 3 मुलींसह वास्तव्याला आहे. ही महिला १८ नोव्हेंबरला डॉक्टरकडे जात असताना तिची मुलगी बेपत्ता झाली होती. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर चार दिवसांनी प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.