Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: स्थायीसाठी आमदारांकरवी फिल्डींग! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; महिला आघाडीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच फिल्डींग लावण्यास सुरूवात केली असून, त्यातही आघाडीवर नाव असलेल्या माधुरी बोलकर व मच्छिंद्र सानप यांनी स्वतंत्रपणे भेट घेण्याचे ठरविले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 18, 2026 | 05:24 PM
स्थायीसाठी आमदारांकरवी फिल्डींग! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; महिला आघाडीवर

स्थायीसाठी आमदारांकरवी फिल्डींग! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; महिला आघाडीवर

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी इच्छुकांनी आता स्थानिक आमदारांकरवी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच फिल्डींग लावण्यास सुरूवात केली असून, त्यातही आघाडीवर नाव असलेल्या माधुरी बोलकर व मच्छिंद्र सानप यांनी स्वतंत्रपणे भेट घेण्याचे ठरविले आहे. पक्षातील अन्य इच्छुकांनीही आपापली नावे पुढे दामटविण्यास सुरूवात केली आहे.

स्थायी समितीवर सर्वाधिक सदस्य भाजपाचे असल्यामुळे सभापतीपद भाजपाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही सर्व महिला सदस्यांची संख्या अकरा असल्यामुळे महिलाच सभापती व्हावी यासाठी भाजपातील महिला इच्छुकांचा आग्रह आहे. त्यातही माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी यांचे नाव पुढे असले तरी, मच्छिंद्र सानप यांच्याही गळ्यात सभापतीपदाची माळ टाकण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप प्रयत्नशील आहेत. बोलकर महापौरपदाच्या उमेदवार होत्या. त्यांच्या नावाची चर्चाही होती. परंतु त्यांना डावलून हिमगौरी आडके यांना संधी देण्यात आल्याने साहजिकच बोलकर स्थायी समिती सभापतीपदासाठी आग्रही आहेत. तर दिपाली कुलकर्णी या ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांना संधी मिळावी असा एक मतप्रवाह आहे. भाजपाने सदस्य निवडीसाठी सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग राबविला आहे.

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

महापौर व उपमहापौर मराठा समाजाचे असल्यामुळे अन्य समाजाला तितक्याच ताकदीचे पद दिले जावे असा एक प्रवाह ओबीसी नगरसेवकांमध्ये आहे. त्यासाठी माधुरी बोलकर यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यांच्यासाठी आमदार सीमा हिरे आग्रही आहेत. त्यांच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री महाजन यांच्याबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस यांचा होकार सर्वाधिक महत्वाचा आहे. त्यामुळे आमदारांच्या मध्यस्थीने सभापतीपद मिळविण्यासाठी रस्सीखेच केली जात आहे. मच्छिंद्र सानप यांच्यासाठी बाळासाहेब सानप है प्रयत्नशील आहेत. भाजपातील वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या संबंधातून तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूत्रासाठी त्यांनीही फिल्डींग लावली आहे.

यंदा स्थायी समितीला अधिक महत्व

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंदाचे स्थायी समितीचे सभापतीपद अतिशय महत्वाचे मानले जात आहे. हजारो कोटींचे कामे केली जाणार आहे. त्यासाठी स्थायी सभापतींची मोहोर महत्वाची आहे. एक वर्षांसाठी का असेना हे पद मिळावे यासाठी साऱ्यांचीच धावपळ आहे. त्यातही महापौर, आयुक्त महिला असल्याने महिलेलाच हा मान मिळावा यासाठी महिलांचा आग्रह आहे.

आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणार

स्थायी समितीच्या सदस्यांची निवड झाल्याने आता या संदर्भातील मंजूर ठराव प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विभागाकडून सदस्यांच्या नावा निशीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. तसेच सभापतीपदाच्च्या निवडणूकीसाठी तारीख व वेळ मागविण्यात येणार आहे. या साऱ्या कार्यवाहीला अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

 

 

 

Web Title: Mla fielding for permanent positions will meet the chief minister women at the forefront

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता!  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
1

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता!  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
3

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
4

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.