Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 05:45 PM
राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात...

राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात...

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला?
  • पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद वाटपाची चर्चा
  • दोन वेगवेगळ्या तालुक्यांना अध्यक्षपदाची संधी
पुणे/ आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी नियमानुसार त्यातील पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या अडीच वर्षांत ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला राबविण्याबाबत अंतर्गत स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पूर्ण कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. मात्र, आरक्षणाच्या फेरबदलामुळे पहिल्या अडीच वर्षांत सर्वसाधारण गटाला संधी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत दोन टप्प्यांत सुमारे सव्वा-सव्वा वर्षे अशी जबाबदारी वाटून देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. पक्षातील विविध गट, ज्येष्ठ-नवोदित सदस्य आणि तालुकानिहाय समतोल साधण्यासाठी हा पर्याय विचाराधीन असल्याचे सांगितले जाते.

विशेषतः भोर, इंदापूर, दौंड आणि मावळ या तालुक्यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या तालुक्यांतील निवडून आलेल्या सदस्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, बारामती, जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर तालुक्यांतील इच्छुकही मैदानात आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर सर्व गटांना समाधान देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

दोन वेगवेगळ्या तालुक्यांना अध्यक्षपदाची संधी

सूत्रांच्या मते, ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला स्वीकारल्यास पहिल्या अडीच वर्षांत दोन वेगवेगळ्या तालुक्यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. उर्वरित अडीच वर्षांच्या आरक्षणाबाबत पुढील निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल. नाराजी टाळणे आणि आगामी पंचायत समिती सत्तासमीकरणांवर परिणाम होऊ नये, यासाठी हा तडजोडीचा मार्ग व्यवहार्य ठरू शकतो, असे पक्षातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद कोणाला मिळणार आणि ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला प्रत्यक्षात येणार का, याकडे पुणे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

Web Title: Ncps formula for the post of pune zilla parishad president has been decided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • maharashtra
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

ऊसतोड कामगारांसह कुटुंबीयांसाठी प्रकल्प कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणार
1

ऊसतोड कामगारांसह कुटुंबीयांसाठी प्रकल्प कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणार

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
2

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय
3

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?
4

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.