Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : ग्राहकांनो इथे लक्ष द्या ! पतंजलीच्या बनावट वेब पेजवरून लाखो रुपयांची फसवणूक

पतंजली या आयुर्वेदीक कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट बनवत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 02, 2025 | 07:45 PM
Navi Mumbai Crime :  ग्राहकांनो इथे लक्ष द्या ! पतंजलीच्या बनावट वेब पेजवरून लाखो रुपयांची फसवणूक
Follow Us
Follow Us:

सावन वैश्य / नवी मुंबई:- पतंजली या आयुर्वेदीक कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट बनवत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांच्या आजारपणाची माहिती पतंजलीच्या वेबसाईटवर भरून एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आजारावरील विविध आजारांच्या वेगवेगळ्या पॅकेजचे एकूण 7 लाख 25 हजार 330 रुपये भरून देखील उपचार होत नसल्याने, चेतन पाटील यांनी बनावट पतंजलीच्या वेबपेज चालक मिश्रा यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घणसोलीतील तळवली नाका येथे राहणारे समाजसेवक चेतन रमेश पाटील यांची पतंजलीच्या बनावट वेब पेजवरून, तब्बल सव्वासात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाबा रामदेव यांचे पतंजली कंपनीचे साहित्य हे आयुर्वेदिक असल्याचा दावा बाबा रामदेव यांच्याकडून केला जातो. सध्याच्या युगात देखील आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांचा कल अशा गोष्टींकडे मोठ्या प्रमाणात असतो.

मात्र याच पतंजलीच्या बनावट वेब पेजने घणसोली तळवली नाका येथील समाजसेवक चेतन पाटील यांची तब्बल 7 लाख 25 हजार 330 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन पाटील यांनी पतंजलीच्या त्या बनावट पेजवर वडिलांच्या आजारपणाची माहिती भरली असता, मिश्र नावाच्या अज्ञात इसमाने चेतन पाटील यांना फोनवर संपर्क करून विश्वास संपादन केला. आरोपी मिश्रा यांनी चेतन पाटील यांच्या वडिलांसाठी लागणाऱ्या उपचाराचे पॅकेज बाबत माहिती सांगून, वेळोवेळी त्यांच्या जवळून एकूण ७ लाख २५ हजार ३३० रुपये बँकेच्या खात्यावर जमा करून घेतले. मात्र एवढे लाखो रुपये जमा करून देखील वडिलांचे उपचार होत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे कळताच, चेतन पाटील यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन बनावट पतंजली वेब पेजवरील मिश्र नावाच्या अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.

 

 

Web Title: A fake website in the name of patanjali an ayurvedic company has been used to defraud millions of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Froud
  • Navi Mumbai Crime
  • Patanjali Group

संबंधित बातम्या

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
1

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.