‘काका तुमच्या एटीएमवरून पैसे निघत नाहीत, हे धरा तुमचे कार्ड’, असे म्हणून एटीएम कार्डची अदलाबदल करून अज्ञाताने सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अर्धांगवायूचा झटका आलेल्या पतीच्या खात्यातून परस्पर १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी तुमच्या मुलाला आर्थिक गैरव्यवहार आणि देशाच्या विरोधात काम केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्याची भिती घालून तब्बल २ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…
वर्क फ्रॉर्म होमची संधी असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी हडपसरमधील तरुणीची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत तिघांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत तिघांची ५५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडीत एक आणि वाघोली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी आहे असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.
सायबर गुन्हेगारांनी पिंपरी-चिंचवड मधील एका व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोेने मिळेल, असे आमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शेअर बाजारात गुंतवणुक तसेच ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तिघांची सायबर चोरट्यांनी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ नागरिकाला एक लिंक पाठवून ती उघडण्यास लावत सायबर चोरट्यांनी मोबाईल अॅक्सेस मिळवत त्यांच्या बँक खात्यातून चार लाख रुपये ऑनलाईन लंपास करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शिवाजीनगर भागातील एका एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी खात्यातून ८० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना पाच लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सहा पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष यशवंत खरात (वय २७, रा. सांगलीवाडी, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी पहाटे सांगलीवाडीतून अटक केली आहे.